३२ दात्यांचे रक्तदान
नंदुरबार येथील पंडित दीनदयाल उपाध्याय नागरी पतसंस्थेतर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३२ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. शहरातील ब्राह्मणवाडी सभागृहात या शिबिराचे उद्घाटन पतसंस्थेचे चेअरमन नानाभाऊ माळी यांच्या हस्ते झाले. पंडित दीनदयाल उपाध्याय व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पतंस्थेचे व्हा. चेअरमन मोहन सखाराम चौधरी, संचालक प्रसाद नारायण बेहेरे, भगवान बाबूलाल माळी, सचिव पांडुरंग शंकर माळी, जनकल्याण रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अर्जुन लालचंदाणी उपस्थित होते. शिबिरासाठी तंत्रज्ञ मधुसूदन वाघमारे, आकाश जैन, अशोक पवार, मदतनीस संजय सूर्यवंशी, आदींनी सहकार्य केले.
खेतिया
खेतिया येथे भाजप मंडळातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगरपालिकेच्या उद्यानातील पंडित दीनदयाल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी उपाध्याय यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास भाजपचे श्याम हरसोला, हिरालाल संचेती, कौशिक पटेल, उपनगराध्यक्ष प्रदीप निकुम, मंडळ अध्यक्ष कमलेश राजपूत, सचिन चौहान, मदन जैन, सूर्यकांत ऐसीकर, नगरसेवक गणेश पवार, नगरसेविका उर्मिला पटेल, नगरसेवक सुरेश चौहान, उद्धव पटेल, गणेश जाधव, कन्हैया माळी, महिपाल जैन, सुनील चौधरी, कमलेश जैन, दीपेश हरसोला, रामचंद्र सोनीस, आशीष संचेती, विनोद जैन, डॉ. दीपक भंवर, दीपक सोनीस, रमेश साहू, जितेंद्र चौधरी, हेमेंद्र सोनी, अमरसिंग चौहान, संदीप पाटील, अंकित चौधरी, विकास निकुम, मनोज वास्कले, योगेश परदेशी, राहुल चौहान, सागर सोलंकी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुलतानपूर
शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ. किशोर पाटील, सुरेखा पाटील, संगीता पाटील, राजेंद्र देसले, आदी उपस्थित होते.