शाळेत प्रवेश मिळत नसल्याने पालकांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:03 PM
2 हजार 37 विद्याथ्र्याचे प्रवेशासाठी त्यातून एकूण 226 विद्याथ्र्याची निवड चिठ्ठी टाकून केली जाणार असलचे सांगण्यात आले होत़े
ऑनलाईन लोकमततळोदा, जि. नंदुरबार, दि. 21 - एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशासाठी आल्याने विद्याथ्र्याच्या पालकांनी सर्वच विद्याथ्र्याना प्रवेश मिळावा अशी मागणी केली़ त्यामुळे प्रकल्प अधिकारी निमा अरोरा यांनी प्रवेश प्रकियेला स्थगिती दिली़ येथील एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रवेश प्रक्रिया सोडत पध्दतीने राबविण्यात आली होती़ 226 पात्र विद्याथ्र्याची निवड केली जाणार असताना त्यासाठी 2 हजार 37 विद्याथ्र्याचे प्रवेशासाठी त्यातून एकूण 226 विद्याथ्र्याची निवड चिठ्ठी टाकून केली जाणार असलचे सांगण्यात आले होत़े उर्वरित 1 हजार 511 विद्याथ्र्याचे काय? असा प्रश्न पालकांनी प्रकल्प अधिका:यांसमोर उपस्थित करुन या निवड प्रक्रियेत इतर विद्याथ्र्यावर अन्याय होत असल्याने विरोध केला़ जागा वाढवत मिळण्याची मागणी प्रकल्प अधिका:यांकडे करण्यात आली़ गोंधळ होत असल्याचे पाहूण प्रकल्प अधिकारी निमा अरोरा यांनी ही प्रवेश प्रक्रिया 25 जुलैर्पयत थांबवण्याचा निर्णय घेतला़ या प्रकल्पांतर्गत चालू शैक्षणिक वर्षासाठी तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यातून इंग्रजी माध्यमिक शाळांसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात आले होत़े त्यात, एकूण 2 हजार 37 अर्ज प्राप्त झाले होत़े पात्र विद्याथ्र्याच्या छाननीनंतर संबंधित यादी प्रकल्प कार्यालयात लावण्यात आली होती़ प्रकल्प कार्यालयाने 226 जागा मंजूर केल्या असून प्रकल्पबाधित, अंपग आदींसाठी 499 जागा राखीव आहेत़ त्यातील तळोदा 51, अक्कलकुवा 59, धडगाव 67 जागा होत्या़