ऑनलाईन लोकमतदिनांक 29 ऑगस्टनंदुरबार : नेवासा येथील एका शाळेत आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे प्रवेश देण्यात आलेल्या 31 विद्याथ्र्याना पालक परत घेवून आले आहेत. दरम्यान, योग्य शाळा न भेटल्यास आंदोलनाचा इशारा पालकांनी दिला आहे.आदिवासी विकास विभागातर्फे आदिवासी विद्याथ्र्याना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिलीत प्रवेश दिला जातो. त्यानुसार नंदुरबार तालुक्यातील 31 विद्याथ्र्याची निवड नेवासा तालुक्यातील भानसहिरवे येथील शाळेत करण्यात आली. पालक 15 ऑगस्ट रोजी जेंव्हा विद्याथ्र्याना भेटण्यासाठी शाळेत गेले तेंव्हा त्यांना शाळेतील दुरवस्थेची विदारक स्थिती दिसली. मुलांना गवताच्या मैदानात ङोंडावंदनसाठी उभे करण्यात आले. शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी, स्वच्छतागृहात आणि मुख्य हॉलमध्ये प्रचंड घाण होती. विद्याथ्र्याचे गणवेश चार ते पाच दिवसांपासून धुतले गेले नव्हते. हॉलमध्ये पंखे व दिव्यांची पुरेशी सोय नव्हती. ही विदारक स्थिती पाहून पालक सर्वच 31 मुलांना घेवून परत आले आहेत. सुविधा असलेल्या दुस:या शाळेत सोय करण्यात यावी अशी मागणी पालकांनी प्रकल्प अधिका:यांकडे केली आहे. आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
असुविधांमुळे पालकांनी काढून घेतले विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 2:49 PM