लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रक्त साठवण केंद्र मंजूर झालेले आह़े परंतु अन्न व प्रशासन विभागाच्या ढिसाळपणामुळे ते कार्यान्वित करण्यात आलेले नसल्याने रुग्णांकडून नाराजी व्यक्त होतेय़याबाबत गणेश सोशल ग्रुपतर्फेही आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आह़े याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन देण्यात आलेले आह़े यात, नमूद केल्यानुसार तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्त साठवण केंद्र मंजूर करण्यात आलेले आह़े ते कार्यान्वित करण्याबाबत विविध कारणे दाखवून समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आह़े अपघातग्रस्त व गरोदर मातांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही़ रक्ताअभावी येथून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येत़े अशा वेळी अतिशय अत्यावस्थ रुग्णास धोका पत्करावा लागत असतो़ तळोदा शहरात रक्तदान शिबीर आयोजीत केले जात असत़े मात्र रक्त साठवण केंद्राअभावी नाईलाजास्तव इतर रक्तपेढय़ांना ते दान करावे लागत असत़े रक्त साठवण केंद्रास मंजूरी मिळून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आह़े निवेदनाच्या प्रती खासदार डॉ़ हीना गावीत, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनाही देण्यात आल्या आहेत़ त्यावर, संजय माळी, हितेंद्र क्षत्रिय, विकास राणे, योगेश मराठे, संदीप परदेशी, धर्मराज पवार, प्रकाश पाडवी, सुनील पाडवी, अमर पाडवी, हर्षल माळी, सागर खैरनार, राजा पाडवी, सत्यवान पाडवी आदींच्या स्वाक्ष:या आहेत़
रक्तसाठवण केंद्राअभावी रुग्णांचे होताय हाल : तळोदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 2:51 PM