लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोठली गावातील नागरिकांनी लोकसहभागातून केलेले जलसंधारणाचे कार्य कौतुकास्पद असून लोकसहभागातून विकासाचा हा 39 कोठली पॅटर्नजिल्ह्यातील इतर गावांसाठी आदर्श आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले.कोठली येथे आयोजित जलपूजन आणि सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर पठारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गट विकास अधिकारी अशोक पटाईत, सरपंच वसंतीबाई वळवी आदी उपस्थित होते. रावल म्हणाले, कोठली गावाने तीन कोटींपेक्षा अधिक खर्चाचे काम लोकसहभागातून उभे केले आहे. जनतेने निर्धार केल्यास अनुकूल बदल घडविता येतो आणि दुष्काळासारख्या गंभीर समस्येवर मात करता येते हे ग्रामस्थांनी एकजुटीने दाखवून दिले. पालकमंत्री रावल यांच्या हस्ते सरपंच, ग्रामसेवक आर.डी.पवार आणि उत्तम कामगिरी करणा:यांचा सत्कार करण्यात आला. जलसंधारणाच्या कामात पुढाकार घेणा:या जलमित्रांना त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.
कोठली पॅटर्न सर्वत्र राबवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 12:26 PM