लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारातील झाड महामार्गावर कोसळून पादचारीचा मृत्यू झाला़ गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला़ कोसळलेले झाड ब:हाणपुर-अंकलेश्वर महामार्गाच्या मध्यभागी पडल्याने वाहतूक ठप्प झाली़ घटनेत आणखी दोघे जखमी झाल़ेजुनाट असे निलगिरीचे झाड अंगावर कोसळल्याने राजू सुरुपसिंग पाडवी, (32) रा़ संजय नगर, रमेश सिंगु पाडवी (33) रा़मक्राणीफळी व अंकिता विक्रम वळवी (20) रा़ राजमोही हे तिघे जखमी झाले होत़े तिघेही या मार्गाने पायी जात असताना झाड त्यांच्या अंगावर कोसळल़े तिघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े दरम्यान राजू सुरुपसिंग पाडवी याचा रस्त्यात मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली़ दोघांवर उपचार सुरु आहेत़ संरक्षक भिंतीच्या पलीकडे असलेले झाड तिघा पादाचारींसह धुळे-अक्कलकुवा या बसवरही कोसळल़े बसमधील प्रवासी मात्र सुखरुप आहेत़ गुरुवारी सकाळपासून वरखेडी नदीच्या पुलावर दुरस्तीचे काम सुरु असल्याने मार्गावर वाहतूक संथ होती़ दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ यातून मार्ग काढत नागरिक पायीच मोलगी चौफुलीकडून बसस्थानकाकडे जात होत़े यातच झाड कोसळल्याने अपघात घडला़
झाड कोसळून पादचारीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 12:04 PM