लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : अवैधरित्या वाळू वाहतुकीस मनाई असतानादेखील गोमाई नदीतून चोरटी वाळू वाहतूक सुरू असल्याने महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.दोन दिवसापूर्वी लांबोळा, ता.शहादा गावालगत रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रेखाबाई भरवाड यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३९ -एफ ४२३८ हे वाळू वाहतूक करताना आढळून आले. त्यात एक ब्रास वाळू भरली होती. याप्रसंगी प्रकाशा मंडळाधिकारी मुकेश चव्हाण यांच्यासह प्रकाशा, लांबोळा, सजदे, शेल्टी, येथील तलाठीच्या पथकाने ते पकडले. या ट्रॅक्टरमध्ये अंदाजे एक ब्रास रेती भरली होती.या वेळी तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या आदेशान्वये पंचनामा करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. हे ट्रॅक्टर शहादा येथील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 12:58 PM