लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गावे पाणीदार करण्यासाठी तेथील स्थानिक ग्रामस्थांचा त्यात लोकसहभाग आवश्यक आह़े गावातील दुष्काळ मिटवण्यासाठी सर्वानी सोबत मिळून श्रमदानात सहभाग घ्यावा त्यासाठी प्रशासनाची मदत घ्यावी असे आवाहन प्रसिध्द सिनेअभिनेते व पानी फाउंडेशनचे प्रणेते आमिर खान यानी दहिंदुले ता़ नंदुरबार येथे केल़े अभिनेते आमिर खान यांनी सोमवारी नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले व उमर्दे या गावांना भेट देवून पानी फाऊंडेशनच्या कामाची पाहणी केली़ तसेच श्रमदानात सहभाग घेतला़ सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास नंदुरबार येथील पोलीस अधिक्षक कार्यालयाजवळील मैदानावर हॅलीपॅडव्दारे त्यांचे आगमन झाल़े सोबत पत्नी किरण राव व सिनेअभिनेता रणवीर कपूर उपस्थित होत़े त्यानंतर चारचाकी वाहनाव्दारे बायपास रोडने त्यांचा ताफा दहिंदुले येथे 9 वाजून 20 मिनीटांनी पोहचला़ या ठिकाणी त्यांनी श्रमदान करुन गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला़ भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी श्रमदान करण्याचे आवाहन त्यांनी केल़े सकाळी साडेअकरा वाजता नंदुरबार तालुक्यातील उमर्दे येथे श्रमदानासाठी आमिर खान व सहकारी रवाना झाल़े या वेळी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी आदी उपस्थित होत़े
गावे पाणीदार करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक : अभिनेते आमिर खान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 11:46 AM