शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

बांधकामाला कुणी जागा देता का जागा

By admin | Published: February 28, 2017 12:38 AM

आरोग्य व उपकेंद्रांची स्थिती : १५ ठिकाणच्या बिकट अवस्थमुळे आरोग्य सेवेवर परिणाम

नंदुरबार _ आरोग्य उपकेंद्रांसाठी कुणी जागा देता का जागा... असे म्हणण्याची वेळ जिल्हा आरोग्य विभागावर आली आहे. उपकेंद्रांसाठी ११ ठिकाणी आणि आरोग्य केंद्रांसाठी चार ठिकाणी जागाच उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. याशिवाय तब्बल ३० ठिकाणी तर इमारतीच नसल्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे.जिल्ह्यात आधीच आरोग्याचे तीनतेरा वाजलेले आहेत. ग्रामिण व दुर्गम भागात नागरिकांना शासकीय आरोग्य सेवेचा आसरा असतो. परंतु तीच सेवा विविध कारणांनी कोलमडलेली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ३० ठिकाणी आरोग्य उपकेंद्रांना इमारतीच नाहीत तर त्यापैकी ११ ठिकाणी जागाच उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. याशिवाय नव्याने मंजुरी देण्यात आलेल्या सहा आरोग्य केंद्रांपैकी चार आरोग्य केंद्रांनादेखील बांधकामासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे आरोग्य आणि बांधकाम विभागाची डोकेदुखी वाढली आहे.जिल्ह्यात ५८ आरोग्य केंद्र आणि २९० उपकेंद्रांद्वारे आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आदिवासी दुर्गम भागात आरोग्य सेवा वेळेवर आणि नियमित पोहचविली जात नसल्याची तक्रार नेहमीचीच आहे. त्यामुळेच अर्भक व बालमृत्यू, माता मृत्यू, कुपोषण, सिकलसेल यांचे प्रमाण वाढत आहे. ही बाब लक्षात घेता आरोग्य सेवा अधिकाधिक विस्तारित करण्याची योजना शासनाची आहे. त्यासाठी नव्याने सहा आरोग्य केंद्र आणि जवळपास ८० उपकेंद्रांना नव्याने मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी अनेक उपकेंद्र कार्यान्वित झाले असले तरी ते भाड्याच्या इमारतीत किंवा कुडाच्या घरात सुरू आहेत. काही ठिकाणी वन विभागाची अडचण तर काही ठिकाणी गावठाणात जागाच उपलब्ध होत नसल्यामुळे इमारती बांधल्या जात नसल्याची स्थिती    आहे.पर्यायी मार्ग काढावाआरोग्य केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग काढण्याची गरज आहे. दुर्गम व आदिवासी भागात वन विभागाचा अडसर येतो. काही गावे ही वनगावे आहेत. त्यांना महसूल गावांचा दर्जा जाहीर झाला असला तरी प्रक्रिया मात्र पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अशा गावांमध्ये मंजूर असलेली आरोग्य उपकेंद्र बांधण्यासाठी जागेची शोधाशोध करावी लागते.३० ठिकाणी इमारती नाहीतकाही ठिकाणी जागा उपलब्ध आहेत तर इमारती नाहीत अशी स्थितीदेखील आहे. त्यात शहादा तालुक्यातील पिंप्राणी, खरगोन, कुरंगी, लंगडी-भवानी, वाघर्डे, काकर्दाखुर्द, नवापूर तालुक्यातील नांदवन, खोलविहीर, सोनपाडा, लक्कडकोट, तारापूर, भांगरापाडा, बारी. नंदुरबार तालुक्यातील मालपूर, भांगडा, शेजवे, आराळे, घोटाणे, नाशिंदे. तळोदा तालुक्यातील इच्छागव्हाण,  रामपूर, मालदा, जुवानी, रांझणी, आलवान, रोझवा प्लॉट, अमोणी, धडगाव तालुक्यातील हातधुई, मोख, केलापाणी या ठिकाणांच्या समावेश आहे.दरम्यान, येत्या आर्थिक वर्षात इमारती बांधकामाला प्राधान्य राहणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.