लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात शासनाच्यावतीने राबवण्यात येणाऱ्या बहुतांश योजना ह्या महिलांचा विकास आणि सक्षमीकरणास पुरेशा असल्याचा निर्वाळा राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या सोसो शाईजा यांनी दिला़ जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत सोसो शाईजा यांनी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत महिला व बालविकासासंबधीच्या विविध योजनांची माहिती घेतली़बैठकीस जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, महिला व बाल विकास कार्यक्रम अधिकारी वर्षा फडोळ, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़पुढे बोलताना सोसो शाइजा यांनी सांगितले की, जिल्ह्यात शासनाच्या वतीने राबविण्यात येणाºया बहुतांश योजना या महिलांचा विकास व सक्षमीकरणास पुरक आहेत़ इतर राज्यातही त्या कार्यान्वित करता येवू शकतात़ कस्तुरबा गांधी निवासी विद्यालय योजनेंतर्गत जिल्ह्यातील सहाही तालुक्यात योजना उत्तमरीत्या कार्यान्वित करण्यात आली आहे़ शाळाबाह्य मुली, निराधार मुली व गरीब मुलींना निवासी व शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले़जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी महिला व बाल विकास विभागाच्या पोषण आहार योजनेंतर्गत जिल्ह्यात जवळपास २०० अंगणवाड्यांमध्ये न्यूट्रेशन गार्डनच्या माध्यमातून स्थानिक पालेभाज्यांची लागवड करण्यात आल्याची माहिती दिली़ पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी महिलांच्या मदतीसाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात दामिनी पथक व भरोसा सेल स्थापन केल्याचे सांगितले. महिला व बाल विकास अधिकारी वळवी यांनी योजना अंमलबजावणीची माहिती दिली़
महिला सक्षमीकरणासाठी योजना पुरेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 11:57 AM