लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 31 मे रोजी सर्वत्र तंबाखू सेवन विरोधी दिन साजरा करण्यात येणार आह़े त्यानिमित्त जिल्ह्यातील सुमारे 50 हजारांहून अधिक जण त्या दिवशी तंबाखू सेवन न करण्याची शपथ घेतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ़मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आह़ेराज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात तंबाखूमुक्तीचे काम मोठय़ा वेगात सुरू आह़े यात, सर्वसामान्य नागरिकांचेसुध्दा मोठे सहकार्य लाभत असल्याचे दिसून येत आह़े सुरुवातीला जिल्ह्यातील शाळा, विद्यालयांमध्ये तंबाखूमुक्तीसाठी मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती़ त्यानंतर शाळा, विद्यालयाना विविध निकषांवर तंबाखूमुक्त करण्यात आल़े याला शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांनीसुध्दा चांगला प्रतिसाद दिला़ परंतु आता ही तंबाखूमुक्तीची मोहीम एक चळवळ म्हणून समोर येताना दिसून येत आह़े 31 मे रोजी जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शहरी तसेच दुर्गम भागातील रहिवासी आदींना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात येणार आह़े पोलीस दलातील कर्मचा:यांनासुध्दा या दिवशी एकत्रित तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात येणार आह़े जिल्ह्यातील दुर्गम भागात व्यसनमुक्ती तसेच तंबाखूमुक्तीचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी शिक्षक, मुख्यध्यापकांचा समावेश असलेले मास्टर ट्रेनरची नेमणूक करण्यात आली आह़े ते धडगाव, मोलगी आदी दुर्गम भागात जात तंबाखूमुक्तीबाबत प्रबोधन करणार आहेत़ विविध स्वयंसेवी संस्था संघटनासुध्दा सक्रियव्यसनमुक्तीच्या कार्यामध्ये सुरुवातीपासूनच विविध स्वयंसेवी संस्था तसेच संघटनांचा सक्रिय सहभाग राहिला आह़े त्यात, डेंटीस्ट असोसिएशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब, आयएमए आदींचा समावेश आह़े व्यसनमुक्तीच्या चळवळीत डेंटीस्ट असोसिएशनतर्फे मोठी मदत होत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितल़े दरम्यान, केवळ एकाच दिवशी तंबाखूमुक्तीची शपथ घेऊन चालणार नसून तंबाखूमुक्तीची चळवळ निर्माण झाली पाहिजे, त्यामुळे यापुढेसुध्दा याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आल़े सप्ताहाभर चालणा:या कार्यक्रमात तंबाखूमुक्त राहण्याबाबत शपथ देणे, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम याविषयी कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरावरही शासकीय कार्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून ठिकठिकाणी माहिती फलक लावण्यात येऊन जनजागृती करण्यात येत आह़े
नंदुरबारात तंबाखूमुक्तीची 50 हजारांहून अधिक जण घेणार शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:57 PM