शहरं
Join us  
Trending Stories
1
जरी मला मुख्यमंत्री केले तरी मी होणार नाही; 'महाराष्ट्राचा सीएम कोण'वर असे का बोलले नितीन गडकरी?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'१५०० दिलेत, महायुतीला मत दिले नाही तर ३००० वसुल करणार'; भाजपा महिला नेत्याचं वादग्रस्त विधान
3
Ranji Trophy : एका डावात दोघांची ट्रिपल सेंच्युरी; डाव घोषित केल्यामुळं हुकली वर्ल्ड रेकॉर्डची संधी
4
महाराष्ट्राच्या रणांगणात ४० लाख उत्तर भारतीय मतदार; मुंबईत २२ जागांवर निर्णायक मते
5
‘बटेंगे तो कटेंगे’,‘एक हैं तो सेफ हैं’वर जरांगेंची टीका; म्हणाले, “मराठा हिंदूतील मोठा समाज”
6
"अदानींचं विमान वापरायचं, गौतमभाई म्हणत सोबत ढोकळा चटणी खायची आणि नंतर…’’, नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
7
“लाखो रोजगार गुजरातला, राज्याचे किती कोटींचे प्रकल्पही गेले?”; राहुल गांधींनी आकडाच सांगितला
8
'PM मोदींनी कधीच संविधान वाचले नाही, त्यामुळे त्यांना ते कळणार नाही,' राहुल गांधींचे टीकास्त्र
9
शरद पवारांनी गद्दार म्हणत पाडण्याचं आवाहन केलं; दिलीप वळसे पाटलांची पहिली प्रतिक्रिया 
10
Swiggy Share Price : सलग दुसऱ्या दिवशीच्या तेजीनंतर Swiggy चा शेअर आपटला, कंपनीला ३ ते ५ वर्षांत उत्तम वाढीची अपेक्षा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली
12
"बटेंगे तो पॉकेट कटेंगे और भाजपावाले हटेंगे तो दाम घटेंगे", महागाईवरून काँग्रेसचा टोला
13
"रोनाल्डो आणि मेस्सीसोबत लव्ह ट्रँगलमध्ये राहायचंय", हे काय बोलून गेली उर्वशी रौतेला?
14
Gold Silver Rate Today : लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीचे दर घसरले; ₹५००० पर्यंत कमी झाला सोन्याचा भाव
15
IND vs SA : फलंदाज अन् गोलंदाज दोघेही तेच; फिल्डर बदलला पण रिझल्ट तोच! (VIDEO)
16
सर्वोच्च न्यायालयाबाहेर एका व्यक्तीने स्वतःला बॉम्बने उडवले, परिसरात एकच खळबळ
17
त्रिपुरारी पौर्णिमा: ५ राशींवर हरिहर कृपा, धनलक्ष्मीचे शुभाशिर्वाद; पद-पैसा-समृद्धी वाढ!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंनी थेटच सांगितलं
19
कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान
20
बटेंगे तो कटेंगेचा नारा देणाऱ्यांकडून त्यांचाच प्रदेश सांभाळला जात नाही; चंद्रशेखर आझादांचे टीकास्त्र

वेलदा येथे जमावाकडून पोलिसांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:16 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाराष्टÑाच्या सीमेलगतच असलेल्या गुजरातमधील वेलदा, ता.निझर येथे जमावाकडून खाजगी दवाखान्याच्या साहित्याची भरचौकात जाळपोळ करण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्टÑाच्या सीमेलगतच असलेल्या गुजरातमधील वेलदा, ता.निझर येथे जमावाकडून खाजगी दवाखान्याच्या साहित्याची भरचौकात जाळपोळ करण्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. दरम्यान, घटनेच्या चौकशीसाठी आलेल्या निझर पोलीस ठाण्यातील फौजदारासह जमादारावरही जमावानेही हल्ला चढविल्याने हे दोघे जण जखमी झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरच गुजरातमधील वेलदा हे गाव आहे. याच गावातील कुकरमुंडाफळी भागातील एका वृद्धेची प्रकृती सोमवारी रात्री बिघडली होती. त्यामुळे त्या वृद्धेचे नातेवाईक रात्री एका खाजगी डॉक्टरांना उपचारासाठी घरी बोलविण्यासाठी आले होते. परंतु कोरोनाची परिस्थिती असल्याचे सांगत डॉक्टरांनी रात्री घरी जाऊन उपचार देण्यास नकार दिला. त्यामुळे वृद्धेचे नातेवाईक संतप्त झाले होते. दरम्यान, सोमवारी रात्रीच संबंधित वृद्धेचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईक व त्या भागातील रहिवासी संतापले. रात्रीच त्यांनी दवाखान्याच्या परिसरात येऊन संताप व्यक्त केला. त्यानंतर मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जवळपास शेकडोच्या संख्येने जमाव दवाखान्याच्या दिशेने चालून आला. दवाखाना बंद होता. त्याचे कुलूप तोडून दवाखान्यातील फर्निचर व काचेची तोडफोड केली. दवाखान्यातील साहित्य काढून ते रस्त्यावर आणले आणि रस्त्यावरच भरचौकात त्याची जाळपोळ केली. या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. निझर पोलिसांना ही माहिती मिळताच फौजदार आर.एच. लोह यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विचारपूस सुरू करताच तेथेच वादावादी झाली व जमावाने पोलिसांनाही मारहाण सुरू केली. त्यामुळे फौजदार लोह यांच्यासह जमादार जयेशभाई लिलकीया हे दोघे जण जखमी झाले. त्यांना निझर येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तब्बल दोन तास हा धिंगाणा वेलदा गावातील भररस्त्यावर सुरू होता. घटनेमुळे वेलदा ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या घटनेसंदर्भात निझर पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.