लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कार्यरत गृहरक्षक दलाच्या जवानांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत़े यात त्यांच्या समस्या जाणून घेत निराकरण करण्यात आल़े पोलीस मुख्यालयातील गंधर्व हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात नंदुरबार, शहादा, नवापुर, तळोदा आणि अक्कलकुवा येथील 510 पुरुष, 90 महिला होमगार्ड आणि 10 अधिकारी उपस्थित होत़ेगृहरक्षक दलाचे जवान व महिला होमगार्डनी त्यांच्या कर्तव्यासह वेतनातील अडचणी यावेळी मांडल्य होत्या़ प्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी अडचणी समजून घेत जिल्ह्यात गणेशोत्सव, मोहरम, इमाम बादशाह उरुस असे सण-उत्सव होणार आहेत़ यावेळी बंदोबस्ताच्या ठिकाणी गैरहजर राहणा:यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे सांगून चांगले काम करण्यासाठी जवानांनी पुढे यावे असे सांगितल़े प्रास्ताविक गृहरक्षक दलाचे प्रशासकीय अधिकारी एस़डी़वाणी यांनी केल़े उत्सव काळात गृहरक्षक दलाकडून मोलाची भूमिका बजावण्यात येणार असल्याने त्यांचा उत्साह वाढवण्यात आला़
गृहरक्षक दलाच्या जवानांच्या समस्यांचे पोलीस दलाकडून निराकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:19 PM