ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 27- ट्रॅव्हल्समधून प्रवास करणा:या मेहसाना (गुजरात) येथील एकाला दोघांनी नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडानजीक उतरवून त्याच्याकडील दोन लाख रुपये काढून घेतले व त्याला शेतात विजेच्या खांबाला बांधून पसार झाले. मेहसाना (गुजरात) येथील भाईलालभाई शिवरामदास पटेल, रा.बोदला, ता.मेहसाना हे धुळे येथून खाजगी ट्रॅव्हल्सने सुरतकडे जात होते. ट्रॅव्हल्स चिंचपाडा रेल्वेगेटनजीक आली असता रेल्वेगेट बंद असल्यामुळे बस थांबली. त्यावेळी मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी भाईलालभाई पटेल यांच्याजवळ जावून त्यांना आपण पोलीस असल्याची बतावणी करीत खाली उतरण्यास सांगितले. त्यांनी डोक्यात हेल्मेट घातलेले होते. खाली उतरल्यावर मोटरसायकलीवर पटेल यांना बसविण्यात आले. तेथून त्यांना घेऊन जात त्यांच्या खिशातून दोन लाख रुपये काढून घेतले. शिवाय त्यांचे कपडे काढून त्यांना जवळच्याच शेतातील विजेच्या खांबाला बांधले. याबाबत भाईलालभाई पटेल यांनी आपल्या कंपनीचे मालक आणि व्यवस्थापकांना घटना सांगितल्यानंतर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस असल्याचे सांगून ट्रॅव्हल्समधील प्रवाशाला लुटले
By admin | Published: April 27, 2017 4:21 PM