प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूरसह लगतच्या परिसरात कमी पजर्न्यमान व परतीच्या पावसानेही निराशा केल्याने सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी, तूर, उडिद आदी पिकांच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची शक्यता आह़े बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावली आह़े त्यामुळे पिकाला लागलेला खर्चही काढणे कठीण झाले आह़ेया वर्षी सरासरीपेक्षा अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आह़े याचा फटका पिकांना बसताना दिसून येत आह़े सोयाबीन पिक ऐन बहरात असताना पाऊस न झाल्याने या पिकाचे नुकसान झाले आह़े परिणामी उत्पन्नात घट झालेली आह़े पिकांवरील खर्च काढणेही शक्य होत नसल्याचे उत्पादक शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े तसेच सप्टेंबर महिन्यात पाऊस नसल्याने कापूस पिकाला बोंडअळीमुळे नुकसान सहन करावे लागले आह़े पिकांची पाने लाल पडत असून यामुळे कापसाचा दर्जा खालावत आह़े या परिसरात सोयाबीन व कापूस हे पिक मोठय़ा प्रमाणात घेतले जात़े ज्वारी, उडीद, तुर या कोरडवाहू पिकांनाही पाणीटंचाईचा फटका बसत आह़ेप्रतापपूर परिसर सातपुडय़ाच्या पायथ्याशी असून या भागात पाण्याची पातळी गेल्या अनेक वर्षापासून तग धरुन होती़ मात्र या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने पावसाळा संपला तरीदेखील पाणी लागले नाही़ त्यात, भाद्रपद महिन्यात तापमानाचा पारा वाढल्याने पिकांचे अधिकच नुकसान होत आह़े आधीच पाण्याची कमतरता त्यात, तापमान यामुळे पिके करपू लागली आहेत़ पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत असून शेतकरी ऊस व केळी पिके वाचविण्यासाठी कसरत करीत आहेत़ बारमाही पिकांवर महागडी रसायने, खते, किटकनाशक, ठिबक सिंचन आदींचा खर्च करावा लागत असतो़ त्यामुळे निदान तेवढा खर्चही निघाला तरी बरे होईल अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त केली जात आह़े दरम्यान, केळी पिकाला जास्त पाणी लागत असत़े या भागात कांदे बाग प्रकारात केळीची लागवड केली जात़े हे पिक उन्हाळ्यात एप्रिल व मे महिन्याच्या अखेरीस निघेल, मात्र तोर्पयत बोअरवेल चालणे अवघड असल्याने शेतकरी पाण्याच्या विवंचनेत आहेत़ प्रतापपूर परिसर सातपुडय़ाच्या पायथ्याशी असल्याने या भागात पर्वत रांगेत गुरांना मुबलक प्रमाणात चारा मिळतो़ मात्र या वर्षी कमी पावसामुळे गवत करपू लागले आहेत़ त्यामुळे चा:याचाही तुटवडा जाणवत आह़े तसेच चा:याचे पिक म्हणून ओळखल्या जाणा:या ज्वारी, मका या पिकांच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट आल्याने पशुपालकांना चा:याचा प्रश्न सतावत आह़े परिसरात पशुपालकांकडे बैल, गाई, म्हशी, शेळ्या मोठय़ा प्रमाणात असून त्यामानाने चा:याचे पिके कमी असल्याने चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आह़े परिसरात खरिपाच्या पिकांना कमी पजर्न्यमानामुळे फटका बसत आह़े यातून उत्पन्नात घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आह़े त्यामुळे शासनाने त्वरीत दुष्काळ जाहीर करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े
प्रतापपूरात पिके करपू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:39 AM