लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : येत्या 1 जुलै रोजी राज्यात होणा:या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात जिल्ह्याकडून योगदान देण्यात येणार आह़े यात सामाजिक वनीकरण विभागाकडून चार लाख झाडे तयार करण्याचे काम सुरू झाले असून यासाठी लागणारे खड्डे रोजगार हमी योजनेतून खोदण्यात येत आहेत़ जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात रस्ते आणि गटक्षेत्रात रोपण करण्यात येणा:या रोपांची लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या सात रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करण्यास वेग देण्यात आला आह़े या झाडांसाठी लागणारे खड्डे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तसेच वनीकरणच्या अंतर्गत योजनेतून होणार असल्याने मजूरांच्या रोजगाराचा प्रश्नही मार्गी लागणार आह़े विविध प्रजातीच्या या झाडांना यंदा विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेल्या गांडूळ खताची मात्रा देण्यात येणार आह़े यातून रासायनिक खतांचा खर्चही कमी होणार आह़े सामाजिक वनीकरण विभागाकडून गटलागवड आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडांचे रोपण करण्यात येणार आह़े सामाजिक वनीकरण विभागाच्या बंधारपाडा, टोकरतलाव ता़ नंदुरबार, आमलाड ता़ तळोदा, दूधखेडा ता़ शहादा, रंगावली ता़ नवापूर आणि गंगापूर ता़ अक्कलकुवा येथे रोपवाटिकांमध्ये ही झाडे तयार करण्यात येत आहेत़ यंदा दुर्गम भागातही झाडे वाढावीत यासाठी मांडवी ता़ धडगाव येथे रोपवाटिका तयार करण्यासाठी विभागाच्या अधिका:यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत़ नंदुरबार तालुक्यात विभागाकडून 1 लाख 35 हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आह़े यात 10 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा आणि पाच गट लागवड क्षेत्रात तब्बल 25 हेक्टर जमिनीवर झाडे रोवण्याचे नियोजन करण्यात आले आह़े याठिकाणी किमान पावणेदोन लाख रोपांची लागवड होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े निम, बदाम,करंज, पळस, वड आणि पिंपळासह इतर फळ आणि फुलझाडे लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने कंबर कसली आह़े यासाठी नंदुरबार तालुक्यात दीड लाख खड्ड करण्याचे उद्दीष्टय़ ठेवण्यात आले आह़े जिल्ह्यात 200 किलोमीटर अंतरावरील रस्त्यांच्या दुतर्फा 1 लाख रोपांचे रोपण होणार आह़े यासाठी चांगल्या दर्जाच्या जाळ्या आणून त्या तेथे बसवून वृक्षांचे संगोपन होणार आह़े
नंदुरबार जिल्ह्यात चार लाख झाडांच्या लागवडीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:34 AM