लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : किटकनाशके हाताळताना विषबाधा होऊन शेतक:यांचे मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत़ या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील खते आणि किटकनाशक विक्रेत्यांनी शेतक:यांचे प्रबोधन करण्याचे आदेश आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिल़े जिल्हाधिकारी कार्यालयातील या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे , तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी, किटकनाशक कंपनी आणि विक्रेते उपस्थित होत़े बैठकीत यवतमाळ व धुळे येथे शेतक:यांचा फवारणी करताना मृत्यू झाल्याच्या घटनांवर चर्चा करण्यात आली़ जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात बहुतांश शेतकरी हे गरीब व अशिक्षित आहेत़ त्यामुळे त्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांची विक्री झाली पाहिज़े औषधांची तांत्रिक माहिती समजावून सांगावी, मान्यता नसलेले बनावट औषधांची विक्र करून नये, अन्यथा विक्री करणा:या कंपन्या, विक्रेते आणि प्रतिनिधी यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे सांगितल़े कृषी विकास अधिकारी लाटे यांनी अती व सौम्य विषारी किटकनाशकांची लेबलनुसार विक्री करून माहिती फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश दिल़े 4बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी चिनी बनावटीच्या पंपांची बाजारात होणारी विक्री थांबवून हे पंप विक्री करू नये असेही विक्रेत्यांना सुचवल़े विषबाधेच्या सर्व घटना चिनी बनावटीच्या पंपांमुळे घडल्याचे याबैठकीत सांगण्यात आल़े बैठकीत विविध 26 अशा उपायांवर चर्चा करण्यात आली़ शहादा तालुक्यातील कळंबू येथील शेतकरी अशोक गोरख पाटील यांचा आठ रोजी कापूस पिकावर फवारणी करताना विषबाधा झाल्याने मृत्यू झाला होता़ या घटनेवरही बैठकीत चर्चा करण्यात आली होती़
विषबाधा टाळण्यासाठी प्रबोधनाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:35 PM