अक्कलकुवा : तालुक्यात आज खासदार डॉ़ हिना गावीत यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले़ या वेळी पंतप्रधान उज्वला योजनेचा शुभारंभ ब्राम्हणगाव येथून करण्यात आला़या वेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, सरचिटणीस डॉक़ांतीलाल टाटीया, मांगीलाल जैन, जयमल पाडवी, अजय पटेल, पंचायत समिती सदस्या कविता कामे, मनोज डागा, प्रा़ दिनेश खरात, सुरेशचंद जैन, योगेश सोनार, जि़प़ सदस्य किरेसिंग वसावे, तालुकाध्यक्ष घनश्याम पाडवी, कपिल चौधरी जयेश चौधरी, संगिता कुमावत,चंपाबाई वळवी, योगेंद्र दोरकर आदी उपस्थित होते़ अक्कलकुवा तालुक्यात ११ रस्त्यांच्या कामांची उद्घाटने तसेच देशातील उज्वला योजनेचा शुभारंभ ब्राम्हणगाव येथे करण्यात आला़ या वेळी डॉ़ गावीत म्हणाल्या की लवकरच गावात पंतप्रधान आवास योजनेची कामे सुरु करण्यात येणार आहेत़ तसेच ज्यांची गॅस योजनेचा लाभ घेतला असेल त्यांनाही पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे त्यांनी सांगितले़आदिवासी महिलांचे आरोग्य चांगले रहावे व त्यांचे कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी आपण विविध योजना राबविणार असल्याचेही खा़ डॉ़ गावीत यांनी सांगितले़ दरम्यान, कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य किरेसिंग वसावे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ़ कांतीलाल टाटीया, नागेश पाडवी आदींनीदेखील विविध विषयांवर मार्गदर्शन केले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंडियन गॅसचे संचालक देविलाल भंसाली, राहुल चव्हाण, संदिप भंसाली आदींनी परिश्रम घेतले़ या वेळी देशातील पहिली लाभार्थी हावडूबाई वसावे, ब्राम्हणगावचे सरपंच जितेंद्र वसावे, उपसरपंच अनवर वसावे, अजबसिंग महाराज, सिंधूबाई वसावे, जगदिश चित्रकथी आदी उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललीत जाट यांनी तर आभार प्रा़ दिनेश खरात यांनी मानले़दरम्यान, योजनेचा लाभ घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते़ (वार्ताहर)योजनेसाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा- खा़डॉ़ गावीतआमदार डॉ़ विजयकुमार गावीत आदिवासी विकासमंत्री असताना आदिवासींना गॅस कनेक्शन ही योजना सुरु करण्यात आली होती़ मात्र त्यावेळी विरोधकांनी ही योजना बंद करण्यासाठी तक्रारी करण्यास सुरुवात करुन योजना बंद पाडली़ परंतु सध्या केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे़ आपण पंतप्रधानांकडे पाठपुरावा करुन पंतप्रधान उज्वला योजना सुरु केली असून त्याचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला़ आदिवासी दुर्गम भागातील ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्रसरकारकडे प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही या वेळी खासदार डॉ़ हिना गावीत यांनी सागितले़
पंतप्रधान उज्वला योजनेचा शुभारंभ
By admin | Published: March 07, 2017 11:26 PM