नंदुरबार : कर्मचा:यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय झाली असली तरी, खाजगी प्रवासी वाहतुकदारांची मात्र ‘चांदी’ असल्याचे दिसून आल़े संपामुळे खाजगी वाहतुकदारांनी अवाच्या सव्वा भाडे आकारल्याने प्रवाशांची आर्थिक पिळवणूक झाली़शुक्रवारी एसटी कर्मचा:यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती़ एकीकडे एसटी कर्मचा:यांनी केलेला संप तर दुसरीकडे खाजगी वाहतुकदारांकडून होत असलेली आर्थिक पिळवणुक यामुळे प्रवासी हैराण झाले होत़े खाजगी वाहतुकदारांकडून शिरपूरसाठी 150 रुपये, धुळ्यासाठी 250 रुपये, जळगाव 500 रुपये, प्रकाशा 100 रुपये आदी दुप्पट भाडेवाढ करण्यात आली होती़ अनेक जण नंदुरबारहून इतर ठिकाणी अपडाऊन करीत असल्याने त्यांना खाजगी वाहनांचा वापर केल्याशिवाय पर्याय नव्हता़ खाजगी वाहतुकदारांनी भाडेवाढ केल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती़ तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्यात येत असल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाल्याचे दिसून आल़े
एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे खाजगी वाहतुकदारांची ‘चांदी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 1:17 PM