शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
4
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
5
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
6
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
7
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
8
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
9
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
10
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
11
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
12
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
13
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
14
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
15
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
16
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
17
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
18
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
19
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
20
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

"शबरीचा सन्मान करणारे श्रीराम कुठे अन् महिलांवर..."; प्रियंका गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 9:33 PM

इंडिया आघाडीचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवींच्या प्रचारसभेत प्रियंका गांधी यांची सरकारवर टीका

Priyanka Gandhi vs PM Modi, Nandurbar Lok Sabha Election 2024 नंदूरबार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मी शबरीचा पुजारी आहे' असा उल्लेख केला. पण कुठे शबरीचा सन्मान करणारे श्रीराम अन् कुठे शेकडो शबरींचा अपमान होत असताना गप्प बसणारे नरेंद्र मोदी... हाथरस, उन्नावमध्ये महिलेवर अत्याचार झाला. तेव्हा मोदी गप्प बसले. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले, महिला खेळाडू न्याय मागत होत्या त्यावेळी मोदी कुठे होते? कुठे भगवान श्रीराम व शबरीमाता आणि कुठे नरेंद्र मोदी, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानावर टीका केली. इंडिया आघाडीचे नंदूरबार मतदारसंघातील उमेदवार ॲड. गोवाल पाडवींच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

"उन्नावच्या आपल्या भगिनीवर तसेच या देशातील अनेक महिलांवर महिलांवर अत्याचार होत असताना मोदींनी त्यांना मदत केली नाही, त्याकडे बघितलेही नाही. ज्यांनी महिलांवर अत्याचार केला त्यांच्या मुलांना भाजपाने उमेदवारी दिली. आदिवासी समाजाच्या विकासासाठी काँग्रेस पक्षाने सातत्याने काम केले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आदिवासी समाजाला जल, जंगल, जमिनचा अधिकार दिला. काँग्रेस सरकारने पेसा कायदा आणला तर राजीव गांधी यांनी पंचायत राज कायदा आणून अधिकार दिले. परंतु भाजपाची विचारधारा याच्या उलट आहे. भाजपा आदिवासी संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करत आहे. आदिवासींच्या जमिनी उद्योगपतींना दिल्या जात आहेत. महाराष्ट्रात २ लाख आदिवासींना पट्टे दिले नाहीत, तर देशभरातील २२ लाख आदिवासींना पट्टे दिले नाहीत, हा आदिवासींचा सन्मान आहे का?" असे प्रियंका गांधी म्हणाल्या.

"नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात जनतेसाठी काय केले ते सांगावे, शेतकरी संकटात आहे, शेती करणे अवघड झाले आहे. आदिवासी, गरिब जनता त्रस्त आहे त्याबद्दल काही बोलावे. मोदींनी परदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाला १५ लाख देतो म्हणाले, दरवर्षी २ कोटी रोजगार देतो म्हणाले पण त्यांनी हे काम केले नाही. मोदींचे राजकारण फक्त सत्तेसाठी आहे, जनतेच्या सेवेसाठी नाही असा ह्ल्लाबोल करत लोकसभेच्या निवडणुकीत विचार करून मतदान करा," असे आवाहन प्रियंका गांधी यांनी केले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Priyanka Gandhiप्रियंका गांधीnandurbar-pcनंदुरबारNarendra Modiनरेंद्र मोदीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४