लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील काही प्रमुख गटारींवरील पक्के अतिक्रमण व साफ-सफाई अभावी गुरूवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी हुतात्मा चौक बाजारपेठ व बसस्थानक परिसरात प्रचंड पाणी तुंबले होते. परिणामी येथील रहदारीदेखील प्रभावीत झाली होती. दरवर्षी पावसाळ्यात हा प्रकार नेहमीच घडत असतो. मात्र पालिका त्यावर ठोस कार्यवाही करायला पुढे येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, या प्रकरणी पदाधिकारी व प्रशासनाने उदासिनता झटकण्याची अपेक्षा आहे.गुरूवारी रात्री शहराबरोबरच संपूर्ण तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. संपूर्ण रात्रभर जोरदार झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी सखलभागात पाणी साचले होते. त्यातही कॉलेज रस्त्याकडून येणारे पाणी स्मारक चौक, तहसील परिसर, बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात साचले होते.अक्षरश: या परिसराला एखाद्या नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे येथील रहदारीदेखील प्रभावीत झाली होती. काही दुकानांमध्ये पाणी शिरून किरकोळ नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. याशिवाय बसस्थानक परिसरातही रस्त्यावर पाणी आले होते. त्यामुळे व्यावसायिकांबरोबर पादचारी व वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. शुक्रवारी बाजार पेठेचा दिवस होता. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे मोठय़ा प्रमाणात हाल झाले. याशिवाय बाहेरील व्यावसायिकांनी लोणचाच्या कै:या विक्रीसाठी आणल्या होत्या. सकाळी पुन्हा कॉलेज रस्त्यावरून पाणी आल्यामुळे त्यांच्या कै:याही वाहून गेल्याची व्यथा व्यावसायिकांनी बोलून दाखविली होती. बस स्थानक व कॉलेज रस्त्याकडील मुख्य गटारींमध्ये प्रचंड गाळ साचला आहे. शिवाय गटारींवरील पक्के अतिक्रमणामुळेच पावसाचे पाणी साचल्याचे नागरिक सांगतात. वास्तविक पावसाळ्यापूर्वी या गटारींची साफ-सफाई होणे अपेक्षित असतांना त्याकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नसल्याचा आरोप आहे. कॉलेज रोड, स्मारक चौक व बसस्थानक रोडकडील गटारींवर व्यावसायिकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाबाबत कधीच ठोस कार्यवाही केली जात नसल्यामुळे त्यांचे फावत आहे. परंतु पावसाळ्यात शहरवासीयांना अडचणींचा सामना करावा लागत असतो. जिल्हा प्रशासनाने तरी या प्रकरणी ठोस भूमिका घेण्याची नागरिकांची मागणी आहे.दरम्यान ही परिस्थिती लक्षात घेऊन पालिकेने जेसीबीद्वारे गटारींची साफ-सफाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. नवापूरहळदाणी, ता.नवापूर परिसरात गुरुवारी व शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने खरीपला काही अंशी त्याचा फायदा होणार असल्याने दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. 4गेल्या आठवडय़ात जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे विकास कामांच्या पाहणीसाठी तळोदा तालुक्याच्या दौ:यावर आले होते. त्यावेळी त्यांनी तळोदा पालिकेस भेट दिली होती. पालिकेत त्यांच्या हस्ते अपंगांना सायकलींचे वाटप करण्यात आले होते. या वेळी प्रभाग एक मधील नागरिकांनी गटारींची साफ-सफाईचा मुद्दा उपस्थित केला होता. याप्रसंगी प्रशासनाने गटारींवरील अतिक्रमणामुळे सफाई कर्मचा:यांना गटारीतील गाळ काढतांना अडचणी निर्माण होत असल्याचे कारण सांगितले होते. परंतु साफ-सफाईबाबत पालिकेची ही अडचण खरी असली तरी गटारींवरील वाढलेल्या अतिक्रमणाबाबत कठोर भूमिका घेण्याची ही आवश्यकता आहे. तरच अतिक्रमणाची शहरवासीयांची डोके दुखी दूर होणार आहे. याबाबत पालिका पदाधिका:यांनीदेखील आपली राजकीय अनास्था बाजूला सारली पाहिजे.
पाणी तुंबल्याने व्यावसायिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:17 PM