शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा नंदुरबारातील नाभिक समाजातर्फे निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:19 PM

जिल्ह्यात आंदोलन : तालुकास्तरावर तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दौंड येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाज बांधवांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेध व्यक्त करत जिल्ह्यात निवेदन देण्यात आल़े जिवा-शिवा सेना, नाभिक समाज संघटना, हितवर्धक समाज यासह विविध संघटनांनी त्यांचा निषेध नोंदवला़नंदुरबार येथे नाभिक समाजातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना निवेदन देण्यात आले. शनिवारी सर्व समाज बांधवांनी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला. नवापूरराज्याचे मुख्यमंत्री यांनी नाभिक समाजाबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा येथील श्री संत सेना महाराज नाभिक हितवर्धक संस्थेने निषेध व्यक्त करीत शनिवारी शहरातील सर्व नाभिक समाज बांधवांनी दुकाने बंद ठेवून तहसीलदार प्रमोद वसावे यांना निवेदन दिल़े मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी विरोधकांना टोला मारताना नाभिक समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखविल्या असे नमूद करून या वक्तव्याचा निषेध नोंदवून मुख्यमंत्री यांनी जाहीर माफी मागावी या साठी आज संपूर्ण महाराष्ट्रात नाभिक समाजाने आपली व्यावसायिक दुकाने बंद ठेवून निवेदन देण्यात आल़े यात नवापूर नाभिक समाजाने सहभाग घेत आपली दुकाने बंद ठेवलीत. निवेदन देतांना श्री संत सेना महाराज नाभिक हितवर्धक संस्था, दुकानदार संघ व नाभिक युवक संघ यांचे पदाधिकारींसह सर्व नाभिक समाज बांधव उपस्थित होते.शहादाशहादा तालुका नाभिक समाजातर्फे शहरात मूकमोर्चा काढण्यात आला़ या वेळी नाभिक समाजबांधवांनी काळ्या फिती लावत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध केला़ संत सेना चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली़ तूप बाजार, मेन रोड, सोनार गल्ली, शाही-मशीद, काझी चौक, खेतिया चार रस्ता चौक, महात्मा गांधी पुतळा या मार्गाने तहसील कार्यालयात आलेल्या मोर्चेक:यांनी तहसीलदार यांना निवेदन दिल़े या वेळी नाभिक समाजाचे अध्यक्ष उद्धव जांभळे, प्रभाकर चित्ते, प्रदीप सोनवणे, लक्ष्मण शिरसाठ, प्रा़ अनिल साळुंके, हेमराज पवार, कृष्णा चित्ते, अनिल ठाकरे, अजय मोरे, अविनाश न्हावी, संतोष सोनगरे, खुशाल न्हावी, राहुल सोळंकी, नीलेश जांभळे, अजरुन सोनवणे, योगेश सोळंकी, हेमंत सोनगिरे, काशिनाथ चित्ते, बन्सी महाले, प्रवीण मोरे, दिलीप कन्हैया, अजय मोरे, देवेंद्र बागुल, सुरेश सैंदाणे, गिरधर न्हावी, सोमनाथ पवार, जयराज बोरसे, दीपक सोनवणे, ज़ेपी़राऊत, तुंबा न्हावी, नीलेश कन्हैया, लक्ष्मण बोरदेकर यांच्यासह समाजबांधव उपस्थित होत़े तळोदानाभिक समाज, अखिल भारतीय जिवा सेना संघटना, गुजर्र नाभिक समाज यांच्यासह समाजातील विविध संघटना, संस्था आणि मंडळे यांच्या वतीने तळोदा तहसीलदारांना निवेदन देण्यात आल़े या निवेदनात देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा निषेध असून त्यांनी संपूर्ण नाभिक समाजाची माफी मागावी, अन्यथा रास्ता रोको व पुतळा दहन असे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला़