लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा, प्रतापपूर, तळवे मोडसह लगतच्या परिसरात केळी व पपई पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे शेतक:यांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आह़ेपरिसरात मोठय़ा प्रमाणात केळी व पपई पिक घेण्यात आले आह़े सतत आले हवामान असल्याने या रोगाचा प्रभाव वाढला असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आह़े करपा रोगाची लागण झाली असल्याने शेतक:यांकडून पिक वाचविण्यासाठी धडपड करण्यात येत आह़े करपा रोगाची माहिती मिळताच तालुका कृषी विभागातील कृषी सहाय्यकांकडून प्रत्यक्ष क्षेत्रांची पाहणी करुन शेतक:यांना विविध बुरशीनाशक, किटकनाशक फवारणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आह़े परिसरात केळीवर करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे प्रथम पानांवर लहान पिवळसर डाग दिसून येतात़ त्यानंतर हे ठिपके तपकिरी रंगाचे लांबट, गोलाकार होत जाऊन कालांतराने राखाडी कलरचे होतात़ यामुळे पानेदेखील लांबट पध्दतीने फाटत जातात़ या रोगाच्या प्रादुर्भावामुळे केळी पुर्णपणे खराब होत असत़े या रोगामुळे पपई फळाचाही आकार कमी होत असल्यामुळे फळाचा दर्जा खालावतो़ त्यामुळे याचा परिणाम उत्पन्नावर होणार असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े परिसरात पपई पिकही मोठय़ा प्रमाणात घेण्यात आली आहेत़ परंतु या पिकावरही रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून येत आह़े रोगामुळे पपई पिकाच्या पानावर करडय़ा, तपकिरी रंगाचे ठिपके पडत आहेत़ पानेही पिवळे होत आहेत़ त्यामुळे शेतक:यांमध्ये रोगाविषयी घबराट पसरली आह़े गेल्या अनेक दिवसांपासून या गावातील शेतशिवारात केळी व पपईच्या पिकांच्या पानांचा रंग बदल असल्याचे शेतक:यांना दिसून आले होत़े परंतु हवामानात होत असलेल्या बदलामुळे याचा प्रभाव काही प्रमाणात पानांवर होत असल्याचे समजत शेतक:यांनी याकडे दुर्लक्ष केल़े परंतु कालांतराने पिकाच्या पानांचा रंग तपकिरी होऊन त्यानंतर पानेदेखील फाटत असल्याचे लक्षात आल्यावर शेतक:यांकडून कृषी विभागातील अधिका:यांना याबाबत माहिती देण्यात आली़ त्यांनतर कृषी विभागाकडून कृषी सहाय्यक तसेच इतरही अधिका:यांनी या क्षेत्रात भेट देऊन पिकांची पाहणी केली़
रांझणी परिसरात ‘करपा’चा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 9:58 AM