शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

पायाभूत सुविधांसाठी तळोदा पालिकेकडून ४७ कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:40 AM

तळोदा पालिका : नगराध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे

तळोदा : शहरातील नवीन वसाहतींमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी येथील पालिकेने साधारण ४७ कोटींचा प्रस्ताव शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठविला असून, या प्रकरणी पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनादेखील साकडे घातले होते.नगरपालिकेने सन २०१६ मध्ये शहराच्या चारही दिशांकडे आपली हद्द वाढविली होती. साहजिकच शहरातील सिताराम नगर, दामोदर नगर, जोशी नगर, प्रतापनगर, प्रल्हादनगर, गोपाळनगर, मिरा कॉलनी, सूर्यवंशीनगर, गिरधर अप्पा नगर, रुपानगर, चाणक्य पुरी, विद्यानगरी, शेठ अंबादास नगर, सूर्यवंशी नगर, हरी ओमनगर, सुमननगर अशा २५ ते ३० नवीन वसाहतीदेखील पालिका हद्दीत आल्या आहेत. यातील बहुतेक वसाहती स्थापन होवून जवळपास १५ ते २० वर्षे झाली आहेत. असे असतांना त्या आजही प्राथमिक सुविधांपासून उपेक्षित आहेत. रस्ते, वीज, पाणी, गटारी या सारख्या आवश्यक सुविधांअभावी पावसाळ्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. सांडपाण्याचे व्यवस्थापन नसल्यामुळे वसाहतधारकांना साथींच्या आजांना सामोरे जावे लागते. एवढेच नव्हे तर पिण्याचे पाणीदेखील नसल्यामुळे खाजगी कुपनलिकाधारकांकडून महागडे पाणी प्यावे लागत असते. दोन वर्षांपूर्वी पालिका हद्दीत समावेश झाल्यामुळे आता आपल्याला सुविधादेखील उपलब्ध होतील, अशी भाबडी आशा वसाहतींमधील रहिवाशांना होती. मात्र दोन वर्षानंतर ही आजतागायत अपेक्षा पूर्ण न झाल्याने वसाहतधारकांमध्ये नाराजीचा सूर होता.महिनाभरापूर्वी तर पालिकेने रहिवाशांच्या हाती प्रचंड घरपट्टीची बिले दिल्यामुळे नागरिकांच्या रोषात अधिकच भर पडली होती. आताही रहिवाशांनी पालिकेने वसाहतींमध्ये निदान रस्ते आणि गटारी या प्रमुख सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पदाधिकाºयांकडे मागणी केली आहे.या पार्श्वभूमिवर पालिकेने विकास कामे करण्यासाठी साधारण ४७ कोटींचा प्रस्ताव तयार करून संबंधीत विभागाकडे पाठविला आहे. आता तो तातडीने मंजूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठोस प्रयत्न करण्याची अपेक्षा वसाहतीमधील रहिवाशांनी केली आहे. अन्यथा पालिकेचा कुठलाही कर न भरण्याचा इशारादेखील वसाहतधारकांनी दिला आहे.