शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नंदुरबारात 29 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव वर्षभरापासून पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:10 PM

हद्दपारीचे प्रकरण : एमपीडीएचाही एक प्रस्ताव, पोलीस प्रशासन हतबल

नंदुरबार : जिल्हा जातीयदृष्टया संवेदनशील असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्यासाठी, त्यांच्यावर वचक बसविण्यासाठी पोलीस विभागातर्फे एमपीडीएच्या एका प्रस्तावासह एकुण 29 हद्दपारीचे प्रस्ताव प्रांताधिका:यांकडे देण्यात आलेले आहेत. या प्रस्तावांना सव्वा वर्ष लोटले गेले तरी त्यावर अद्याप कुठलीही कार्यवाही न झाल्याने पोलीस विभागही हतबल झाला आहे. हे प्रस्तावांवर नोटीसा दिल्या गेल्या असत्या तर किमान गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात प्रशासनाला थोडेफार यश आले असते.जिल्हा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासन दरबारी जातीयदृष्टया संवेदनशील म्हणून नोंद आहे. याशिवाय गुजरात व मध्यप्रदेश या दोन राज्यांच्या सिमा जिल्ह्याला लागून आहेत. परिणामी कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. ही बाब लक्षात घेता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी कसरत करावी लागते. ही बाब लक्षात पोलिसांनी तब्बल 29 जणांवर हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. ते प्रस्ताव गेल्या वर्षी जून महिन्यात महिन्यात प्रांताधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले होते. त्यावर निर्णय होणे अपेक्षीत असतांना सव्वा वर्ष उलटले तरी अद्याप त्यावर काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तत्कालीन प्रांताधिकारी यांची बदली झाल्यानंतर आता दुसरे प्रांताधिकारी तिन्ही ठिकाणी आले आहेत. त्यांनीही याला महत्त दिलेले नाही. याशिवाय एमपीडीएचे दोन प्रस्ताव देखील जिल्हा पोलिसांनी पाठविले आहेत. पैकी एका प्रस्तावावर कारवाई करण्यात आली तर दुसरा प्रस्ताव पडून आहे. यापैकी निम्मे प्रस्तावांवर देखील कारवाई झाली असती तर गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले असते.दुसरीकडे जिल्हा पोलीस प्रमुखांनी गेल्या आठवडय़ात दहा जणांवर तडीपारची कारवाई करीत त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. आता प्रांताधिकारी यांनी देखील त्यांच्याकडे असलेल्या प्रस्तावांवर नजर फिरवून जे प्रस्ताव तातडीने पारीत करणे आवश्यक आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा जिल्हावासीयांकडून व्यक्त होत आहे.प्रतिबंधात्मक कारवाईगणेशोत्सवाच्या पाश्र्वभुमीवर जिल्ह्यात गेल्या वर्षी  सीआरपीसी 110 (ई)(ग) प्रमाणे 71, सीआरपीसी 107 प्रमाणे 99 तसेच सीआरपीसी 144 (2) प्रमाणे आठ, सीआरपीसी 151 (1) व मुंबई पोलीस कायदा कलम 68, 69 अन्वये 69 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 204 जणांना सीआरपीसी 149 प्रमाणे नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.यंदा सीआरपीसी कलम 110 अन्वये 55, कलम 109 प्रमाणे सात, 149 प्रमाणे 634 अशा एकुण 1319 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय दारुबंदी कायदा कलमान्वये 40 जणांवर कारवाई करण्यात आली. 144 प्रमाणे 77 जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. 23 सराईत गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, पोलीस अधीक्षकांना असलेल्या अधिकारात मंगळवारी 27 जणांना तातडीने शहराच्या हद्दीत येण्यास 23 सप्टेंबर्पयत प्रतिबंध करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या पाश्र्वभुमीवर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 27 जणांना नंदुरबार शहर हद्दीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे तातडीने आदेश जिल्हा पोलीस दलाने बजावले आहेत. 23 सप्टेंबर्पयत हे आदेश कायम राहणार आहेत. गणेशोत्सव व मोहर्रमसणाच्या पाश्र्वभुमीवर सर्व संबधितांना नोटीस देवून त्यांचे म्हणने ऐकुण घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्यामुळे एकतर्फी आदेश काढणे आवश्यक असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.27 जणांमध्ये केतन दिलीपसिंग रघुवंशी, एजाज इस्माईल बागवान, कुणाल जगन्नाथ मराठे, कृष्णा लक्ष्मण पाडवी, निहाल अहमद शेख फिरोज, पिटर उर्फ प्रविण शामराव पाटील, अल्ताफ इसाक पिंजारी, मजिदखान सलिमखान पठाण, नूर महेमूद कुरेशी, ईस्माईलशहा शकुरशहा फकिर, नरेंद्र परशुराम पाटील, बोका उर्फ मोहमंद रईस शेख रज्जाक, मनिष सुरेश चौधरी, अझहरूल इस्लाम मजहरुल इस्लाम सैय्यद, संभाजी आप्पा माळी, सिराजोद्दीन एनोद्दीन शेख, गणेश तुकाराम सोनवणे, कृष्णा आप्पा पेंढारकर, भैय्या उर्फ सूर्यकांत सुधाकर मराठे, सचिन भिका मराठे, धर्मेद्र उर्फ धरमदास केशव जव्हेरी, मयुर वामन चौधरी, नयन दिलीप चौधरी, कैलास आप्पा पेंढारकर, फिरोज शेख अल्लाऊद्दीन मन्यार, बाबुशेख महेबूब कुरेशी यांचा समावेश आहे.