ऑनलाईन लोकमतबोरद/रांझणी/ब्राrाणपुरी, दि़ 22 : येत्या काही दिवसात खान्देशासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पुन्हा गारपीटीचे संकट निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आह़े त्या अनुशंगाने जिल्ह्यातील शेतक:यांकडूनही गारपीटीचा सामना करण्यासाठी खबरदारीचे उपाय योजना करण्यास सुरुवात करण्यात आली आह़े बहुतेक शेतक:यांकडून आपल्या पिकांना वाचवण्यासाठी संरक्षणात्मक उपाय अवलंबण्यात येत आह़ेब्राrाणपुरी येथे पीके काढणीवर. सध्या शेतक:यांचा गहु, हरभरे, पपई आदी पीक काढणीवर आले आहेत़ यातच वादळाचे संकेत आल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच गोत्यात अडकला आहे. संभाव्य गारपीटीचा सामना करण्यासाठी परिसरातील शेतक:यांनी काढणीवर आलेले पीक शेतातून आपल्या गोठय़ात ठेवण्यास सुरुवात केले आहे. ज्या शेतक:यांचे काढणीवर आलेल्या हरभरे, गहू, पपई या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याने त्यांच्याकडून चिंता व्यक्त होत आहे. शेतकरी पैशांची जुळवा जुळव करून पीक मोठे करतो परंतु अवकाळी पावसामुळे शेतक:यांचे नुकसान होत असल्याने त्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी होत आहे. रांझणीत रब्बी पिक संकटात रांझणी येथे शेतक:यांकडून शेतशिवाराती शेतमाल, चारा सुरक्षित जागी जसे गोदाम, गोठा तसेच घरात हलवण्यात आला आह़े शेतीमालासह पाळीव पशुंनाही आडोशाच्या ठिकाणी बांधण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आह़े परिसरात मोठय़ा प्रमाणात उसतोड सुरु आह़े त्यामुळे ऊस उत्पादक शेतक:यांपुढेही आता संकट निर्माण झाले आह़े तळोदा तालुक्यात गहू, हरभरा ही रब्बी पिके तयार काढणीसाठी तयार झाली आहेत़ अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाल्यास त्याचा फटका सर्वाधिक रब्बी पिकांना बसणार आह़े दरम्यान, याआधी झालेल्या गारपीटीपासून उत्तर महाराष्ट्र बचावला होता़ परंतु आता पुन्हा हवामान खात्याकडून गारपीटीचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण आह़े
पिकांचे संरक्षण करण्यासाठी नंदुरबारातील शेतक-यांमध्ये लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:11 PM