शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पॅकेज द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 12:43 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन आणि कोरोनामुळे एस.टी.महामंडळही आर्थिक अडचणीतून जात आहे. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर झाला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊन आणि कोरोनामुळे एस.टी.महामंडळही आर्थिक अडचणीतून जात आहे. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर झाला आहे. जनतेला एस.टी.ची किफायतशीर व सुरक्षीत सेवा मिळावी यासाठी पुर्ण वेतन मिळावे व महामंडळास आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी महाराष्टÑ एस.टी.वर्कस काँग्रेस अर्थात इंटकतर्फे करण्यात आली आहे.यासंदर्भात इंटकेन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महामंडळातील कर्मचाºयांचे पगार आधीच कमी आहेत. त्यात ७० व ५० टक्के पगार दिला जात आहे. त्यातही विविध कपाती केल्या जात आहेत. त्यामुळे अतीशय कमी पगार कर्मचाºयांच्या हाती पडत आहे. त्यामुळे महामंडळास सार्वजनिक वाहततुक व्यवस्था मजबूत करण्याच्या हेतूने हजार कोटी रुपये अनुदान देण्यात यावे.मे व जून या महिन्याचे उर्वरित ५० टक्के वेतन तात्काळ देण्यात यावे. जून देय जुलै या महिन्याचे वेतन देय असलेल्या तारखेस देण्यात यावे. एस.टी.कर्मचाºयांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे वेतन देण्यात यावे. देशातील इतर राज्याप्रमाणे प्रवाशी कर १७.५ टक्के ऐवजी ७ टक्के आकारण्यात यावा. राज्यातील सर्व टोल टॅक्स माफ करण्यात यावा. मोटार वाहन कर माफ करण्यात यावा. डिझेल वरील व्हॅट कर माफ करण्यात यावा.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता कर माफ करण्यासंदर्भात शासनाने आदेश पारीत करावे. वस्तू व सेवा करात सूट द्यावी. परिवर्तन बस खरेदीसाठी आर्थिक सहाय्य करावे. एस.टी.महामंडळास आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपाययोजना करावी. खाजगी कंत्राटे रद्द करावी यासह इतर विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.गेल्या तीन महिन्यापासून एस.टी.सेवा बंद आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून तालुका मुख्यालय स्तरावर एस.टी.सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे.एस.टी.ने आता मालवाहतूक देखील सुरू केली आहे. त्याला बºयापैकी प्रतिसाद मिळाला आहे. परंतु त्यामुळे मात्र एस.टी.चे नुकसान भरून निघणे शक्य नाही.