शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
5
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
6
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
7
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
8
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
9
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
10
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

शौचालयाच्या स्वच्छतेसाठी तालुकास्तरावर व्हॅक्यूम यंत्र द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 11:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  तालुक्यासह राज्यातील ग्रामीण भागात गेल्या पाच वर्ष अगोदर लाभार्थ्यांनी शौचालय बांधकाम करून वापर सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  तालुक्यासह राज्यातील ग्रामीण भागात गेल्या पाच वर्ष अगोदर लाभार्थ्यांनी शौचालय बांधकाम करून वापर सुरू केलेला आहे. या शौचालयातील घाण काढण्याकरिता तालुकास्तरावर किंवा पंचायत समितींना व्हॅक्युम यंत्र विभागीय कार्यालयाने उपलब्ध करून द्यावे अथवा स्थानिक शेष फंडातून किंवा स्वच्छ भारत मिशन अंतर्गत यासाठी निधी उपलब्ध करून देत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांच्या समस्या दूर करण्यात, यावी अशी मागणी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे शहादा तालुक्यातील मंदाणा ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल भामरे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.                 नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकताच नंदुरबार जिल्हा दौरा केला. यादरम्यान शहादा पंचायत समितीचे सदस्य शरद साळुंखे, मंदाणा ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल भामरे यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेऊन त्यांना शहादा तालुका पंचायत समिती अंतर्गत राबविल्या गेलेल्या भारत मिशन व महात्मा गांधी रोजगार योजने अंतर्गत हगणदारीमुक्त करण्याच्या अभियानाला गेल्या पाच वर्षापासून सुरूवात करण्यात आलेली आहे. या अभियानामुळे ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांनी घरासमोर वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण करून त्याच्या वापर सुरू केलेला आहे. बेसलाइन सर्व्हेनुसार कुटुंबांनाही वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी लाभ दिलेला आहे. यानुसार सदर शौचालय हे कुटुंब वापरत असून, त्या शौचालयाच्या सेफ्टी टँक खाली करण्याकरिता ग्रामपंचायत स्तरावर किंवा तालुका स्तरावर पंचायत समितींना कुठल्या ही यंत्रणा उपलब्ध नाहीत. परिणामी लाभार्थी सदर टाकीखाली करून पुन्हा वापरण्यासाठी खासगी वाहकाला १ ते एक हजार ५०० रुपये खर्च करावे लागत आहे. आर्थिक निकष असलेले कुटुंब सेफ्टी टँकखाली करीत नसल्यास सदर शौचालय वापरणे बंद होते. व संबंधित कुटुंब पुन्हा उघड्यावर शौचास जाणे पसंत करीत असून, शासनाच्या हगणदारीमुक्तीचा हेतू विफल होताना दिसून येत आहे. अत्यावश्यक गरज लक्षात घेता तसेच शासनाच्या हगणदारीमुक्ती अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिका धर्तीवर तालुका पातळ्यांवर ही पंचायत समितींना व्हॅक्युम वाहन उपलब्ध करून द्यावे. यासाठी जिल्हा परिषद सेस फंडातून वाहन खरेदी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी देऊन हगणदारीमुक्ती योजना सफल होणार आहे.                  नगरपालिका धर्तीवर जिल्हा परिषद विभागामार्फत तालुका पंचायत समितींना व्हॅक्युम क्लिनर वाहन उपलब्ध करून दिल्यास संबंधितांकडून नाममात्र फी आकारल्यास जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. या वाहनामुळे लाभार्थ्यांची गैरसोय दूर होऊन शासनाच्या हगणदारीमुक्त अभियानाचा उद्देश शंभर टक्के यशस्वी होणार आहे. विभागीय कार्यालयाकडून या योजनेचे नियोजन करून स्वच्छ भारत मिशन फेज दोन अथवा सेस फंडा अंतर्गत व्हॅक्युम क्लिनर वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी मंदाणा ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल भामरे आदींनी केली आहे.