शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

तळोदा व धडगाव तालुक्यात अॅनिमेशनद्वारे महिलांमध्ये जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:54 PM

बालमृत्यू रोखण्यासाठी उपाय : तळोदा व धडगाव तालुक्यात पाच हजार गर्भवती महिलांची नोंदणी

लोकमत ऑनलाईनतळोदा, दि़ 21 : माता व बालमृत्यू रोखण्यासाठी टॅबलेटच्या माध्यमातून अॅनिमेशनद्वारे महिलांमध्ये जनजागृती केली जात आहे. आतापावेतो तळोदा व धडगाव तालुक्यातील पाच हजार 348 गरोदर माता व एक हजार 500 बाळांची नोंदणी करण्यात आली आहे. यातील दोन हजार 338 महिला, 232 बाळांना सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत. यासाठी वित्तिय सहाय्यता टाटा ट्रस्टकडून संस्थेला पुरविली जात  आहे. यात शासनाचा निधी नसला तरी शासनाच्या सहकार्यातून हे मिशन राबविले जात आहे. सातपुडय़ातील वाढलेले बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी या संस्थेस टाटा ट्रस्टने अर्थसहाय्य दिले आहे. प्रायोगिक तत्वावर संस्थेने तळोदा व धडगाव ही तालुके घेतली आहेत.यात 151 गावांचा समावेश करण्यात आला आहे. योग्य जोडपे, गर्भवती माता आणि बाळ यांची नोंदणी मोबाईल अॅमध्ये करण्यात येवून त्यानंतर टॅबलेटच्या माध्यमातून अॅनिमेशनद्वारे या महिलांना मार्गदर्शनाबरोबरच जागृती केली जात आहे. बालसंगोपन, लसीकरण, नियोजन, अनेमिया, स्तनपान, उच्चधोकादायक  आरोग्याची चिन्हे, संस्थात्मक प्रसुती, डायरीया, एचआयव्ही एड्स याबाबत महिलांचे समुपदेशन केले जात असून, त्यांना आरोग्य सुविधाही पुरविण्यात येत आहेत.या कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापावेतो पाच हजार 348           गरोदर माता, एक हजार 491 बालकांची नोंदणी करण्यात आली आहे. यातून दोन हजार 338 महिला   व 232 बालकांवर योग्य उपचार सुरू आहे. यासाठी सदर संस्था दोन्ही तालुक्यातील आरोग्य यंत्रणांचे सहकार्य घेत आहे. संबंधीत प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील नर्सच्या मदतीने संस्था हे मिशन राबवित आहे. टॅबवरील अॅनिमेशनच्या चित्रांमुळे महिलांना माहिती लवकर समजते. त्यामुळे महिलांचा  प्रतिसादही उत्स्फूर्तपणे मिळत असल्याचे सांगण्यात आले. परिणामी निश्चितच या दोन तालुक्यातील माता-पालक मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. हे मिशन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सीओ काळे परेश, प्रकल्प व्यवस्थापक आशिष भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प समन्वयक नीलचंद्र शेंडे व त्यांची टीम मेहनत घेत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील बाल-माता मृत्यू कमी करण्यासाठी संस्थेने मोबाईल टॅबवर एम खुषहाली हे अॅप तयार केले आहे. यात अॅनिमेशनचा डाटा लोड करण्यात आला आहे. त्यामुळे अॅनिमेशनद्वारे महिलांना मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर या अॅपमुळे महिलांना आरोग्याची माहिती देणे सोपे होते. महिलाही उत्सुकतेने सहभागी होतात. अॅपमध्ये नोंदणी केलेल्या माता व बालकांची संपूर्ण आरोग्याची माहिती संकलीत होत असल्याने प्रत्येक आरोग्य यंत्रणेला समजते. त्यावरून अचूक मूल्यमापन अन वेिषण करण्यात येवून योग्य औषधोपचार केला जातो. शिवाय एमला देखील एसएमएसद्वारे रुग्णावरील उपचार सूचित करता येतो. सर्वरच्या मदतीने डॅशबोर्डवर माहिती नर्सला पाठविण्यात येत असल्यामुळे जोखमीच्या माता ओळखल्या जावू शकतात. अपेक्षीत प्रसुती तारीख तसेच कृती आराखडा, दरमहा भेटी, भेटीचे नियोजन कार्यबद्ध स्वरूपात करता येते. यासाठी या दोन्ही तालुक्यातील 37 नर्स सेविकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना टॅबदेखील पुरविण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हा प्रशासन यावर वॉच ठेवून आहेत.