लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेचे ५६ गट आणि पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी बुधवारी जाहिर झालेल्या निकाला राजकीय मातब्बर नेत्यांचा पराभव झाला़ यात भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, विसरवाडी ता़ नवापुरचे सरपंच बकाराम गावीत, आदिवासी विकास मंत्री के़सी़पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी, माजी कृषी सभापती डॉ़ भगवान पाटील, माजी आमदार नरेंद्र पाडवी यांच्या पत्नी आशाबाई पाडवी यांचा पराभव झाला़दरम्यान तळोदा तालुक्यातील बुधावल गटातून काँग्रेसचे विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक हे विजयी झाले़ त्यांनी शिवसेनेचे उमेदवार आकाश वळवी यांचा पराभव केला़ तळोदा तालुक्यातील अमोनी गटातून काँग्रेसच्या अॅड़ सीमा वळवी ह्या विजयी झाल्या़ त्या माजी मंत्री अॅड़ पद्माकर वळवी यांच्या कन्या आहेत़ तळोदा तालुक्यातील प्रतापपूर गटातून भाजपाच्या संगिता प्रकाश वळवी, बोरद गटातून भाजपाच्या सुनिता भरत पवार, आमलाड गटातून भाजपाच्या पार्वतीबाई दामू गावीत ह्या विजयी झाल्या़ तालुक्यात पाचपैकी दोन ठिकाणी काँग्रेस तर तीन ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांचा विजय झाला़धडगाव तालुक्यातील तोरणमाळ गटात प्रथमच निवडणूक लढवणाऱ्या आदिवासी विकासमंत्री अॅड़ के़सी़पाडवी यांच्या पत्नी हेमलताबाई पाडवी ह्या पराभूत झाल्या आहेत़ त्यांचा शिवसेनेचे धडगाव तालुकाप्रमुख गणेश पराडके यांनी पराभव केला़ तालुक्यातील घाटली गटातून शिवेसनेचे रविंद्र पारशी पराडके, मांडवी गटातून शिवसेनेचे विजय पराडके, कात्री गटातून काँग्रसेचे रतन पाडवी, रोषमाळ गटातून काँग्रेसच्या संगिता विजय पावरा, असली गटातून काँग्रेसचा रुपसिंग सिंगा तडवी, राजबर्डी गटातून काँग्रेसचे जान्या फुलजी पाडवी हे विजयी झाले आहेत़नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली गटातून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची पुत्र अॅड़ राम रघुवंशी हे शिवसेनेकडून विजयी झाले आहेत़ त्यांनी भाजपाचे रविंद्र गिरासे यांचा पराभव केला़ खोंडामळी गटातून भाजपाच्या शोभा शांताराम पाटील ह्या विजयी झाल्या़ पातोंडा गटातून डॉ़ विजयकुमार गावीत यांच्या वहिनी विजया प्रकाश गावीत, रनाळे गटातून शिवसेनेच्या शकुंतला शिंत्रे, शनिमांडळ गटातून भाजपाच्या रुचिका प्रविण पाटील ह्या विजयी झाल्या आहेत़ कोळदे गटातून भाजपाच्या योगिनी अमोल भारती ह्या विजयी झाल्या़नवापुर तालुक्यातही काँग्रेसच्या वर्चस्वला राष्ट्रवाादी काँग्रेसने छेद दिला आहे़ येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित सुरुपसिंग नाईक हे उमराण, दिपक सुरुपसिंग नाईक हे भरडू गटातून विजयी झाले़ मोग्राणी गटातून राष्ट्रवादीच्या सुशिला कोकणी तर निजामपूर गटातून काँग्रेसचे प्रकाश फकिरा कोकणी हे विजयी झाले़म्हसावद गटातून काँग्रेसचे अभिजीत पाटील यंनी विजय प्राप्त केला आहे़ दुसरीकडे काँग्रसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक हे नवापुर तालुक्यातून पराभूत झाले आहेत़शहादा तालुक्यात सर्वाधिक १४ गट आणि २८ गणांसाठी निवडणूक घेण्यात आली यात कन्साई गटातून काँग्रेसच्या रजनी सुरेश नाईक ह्या विजयी झाल्या़शहादा तालुक्यातील सर्वाधिक चर्चित असलेल्या म्हसावद गटातून काँग्रेसचे अभिजीत मोतीलाल पाटील हे ४ हजार ९३७ मतांनी विजयी झाले़ त्यांनी अब्दुल जब्बार शेख आजाद ( अपक्ष ), मनलेश एकनाथ जायसवाल ( मनसे ), भगवान खुशाल पाटील ( भाजप , विक्रांत अशोक पाटील ( राष्ट्रवादी ) आणि अपक्ष उमेदवार शशिकांत पाटील यांचा पराभव केला़अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी येथून शिवेसेनेचे मातब्बर नेते किरसिंग वसावे यांच्या पत्नी बाजूबाई वसावे ह्या विजयी झाल्या़ अक्कलकुवा गटातून भाजपाचे कपिलदेव भरत चौधरी हे विजयी झाले़ भगदरी गटातून काँग्रेसचे माजी सभापती सीक़े़पाडवी हे विजयी झाले़ पिंपळखुटा गटातून काँग्रेसच्या निर्मला सिताराम राऊत ह्या विजयी झाल्या़ वेली गटातून काँग्रेसच्या विद्यमान सभापती हिराबाई रविंद्र पाडवी, गंगापूर गटातून काँग्रेसचे जितेंद्र दौलतसिंग पाडवी हे विजयी झाले़ त्यांनी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांचा पराभव केला़
प्रमुख उमेदवारांना पराभवाचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 1:16 PM