तळोदा तालुक्यात थंडीअभावी रब्बीचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:57 AM
तळोदा तालुका : यंदा गहु, हरभरा पेरणी लांबण्याचा अंदाज
लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील सातपुडा पायथा परिसरात थंडीअभावी रब्बीची पेरणी खोळंबली आह़े परिसरातील पाडळपूर, रोझवा पुनर्वसन, गढीकोठडा, वरपाडा, गोपाळपूर पुनर्वसन आदी परिसरात अद्यापही गहू, हरभरा पिकांची समाधानकारक पेरणी झालेली नाही़नोव्हेंबर महिना अध्र्यावर आला असला तरी वातावरणात पिकांना पोषक असलेला गारठा अद्याप निर्माण झालेला नाही़ त्यामुळे शेतक:यांकडून गहू, हरभरा पेरणीला विलंब होत आह़े दरम्यान शेतक:यांकडून ज्यारी, सोयाबीन, मकासह इतर खरीप पिके घेतलेली शेते मशागत करुन तयार आह़े परंतु अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात गारठा जाणवत नसल्याने शेतक:यांना कडाक्याच्या थंडीची प्रतिक्षा लागून आल़े रोझवा लघुप्रकल्पाची गळती सुरुच असल्याने गहुसारखे पिके पेरल्यास पाच ते सहा वेळा पाणी देणे शक्य होणार नसल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े कमी पाण्यात लवकर येणारे हरभरा पिक पेरणीस शेतकरी प्राधान्य देणार असल्याचे परिसरातून सांगण्यात येत आह़े त्यामुळे साहजीकच यंदा हरभरा पिकाचे क्षेत्र वाढणार असल्याचे स्पष्ट आह़े मागील हंगामाच्या तुलने यंदाच्या हंगामात गहु व हरभरा पेरणी उशिराने होणार असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़े मागील वर्षी पावसानेदेखील दमदार हजेरी लावली होती़ त्यामुळे साहजिकच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच कडाक्याची थंडी जाणवायला लागली होती़ त्यामुळे थंडी पडायला लागल्यावर लागलीच शेतक:यांनी सुमारे 70 ते 80 टक्के पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ातच केल्याची माहिती परिसरातील जाणकार शेतक:यांनी दिली़ परंतु यंदा त्याच्या विपरित स्थिती निर्माण झाली आह़े परिसरात इतर तालुक्याच्या दृष्टीने समाधानकारक पाऊस झाला असला तरी लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतील इतका पाऊस झालेला नाही़ तुरळक झालेल्या पावसाने पाण्याची पातळीदेखील वाढली नसल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे साहजिकच अद्याप थंडीलाही सुरुवात झालेली नाही़ नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ परिसरात नेहमीच पाण्याची टंचाई जाणवत असत़े यंदा विहिरींसह, नद्या, लघुप्रकल्प आदींमध्येही पाणी नसल्याने यंदाचा रब्बी हंगाम लांबण्याची शक्यता आह़े मागील वर्षी येथील शेतक:यांनी कांदा हे पिक मोठय़ा प्रमाणात लावले होत़े