लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 15 : नंदुरबार-दोंडाईचा नवीन दुहेरी रेल्वेमार्गाच्या रनाळे ते दोंडाईचा दरम्यानच्या मार्गाची सोमवारी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर या 35 किलोमिटर रेल्वेमार्गावर ताशी 120 किलोमिटर वेगाने रेल्वे चालविण्यात आली. चाचणी यशस्वी झाल्यानंतर आता हा मार्ग प्रत्यक्षात वापरात येणार आहे. उधना-जळगाव या 306 किलोमिटर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण पुर्ण झाले असून शेवटच्या टप्प्यातील नंदुरबार-दोंडाईचा या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाची चाचणी रविवार व सोमवारी घेण्यात आली. चाचणी घेणा:या अधिका:यांमध्ये सुशिल चंद्र, एम.के.गुप्ता, संजय मिश्रा, विलास वाडेकर, श्रीनिवासन, संजीव भुताणी, एन.डी.कुंभेर, मेंढेकर यांचा समावेश होता.रविवारी नंदुरबार ते रनाळे दरम्यान तर सोमवारी रनाळे ते दोंडाईचा दरम्यानची चाचणी झाली. छोटय़ा ट्रॉलीवरून रुळांचे परिक्षण पुर्ण झाल्यानंतर सोमवारी दुपारी या मार्गावरून रेल्वे चालविण्यात आली. ताशी 100 ते 120 किलोमिटर वेगाने रेल्वे धावली. त्यातही पश्चिम रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी नवीन रुळावर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना करण्यात आल्या होत्या.आता या चाचणीचा अहवालानंतर हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात वापरात येणार आहे. साधारणत: जून महिन्याच्या दुस:या आठवडय़ापासून उधना-जळगाव हा दुसरा रेल्वेमार्ग वापरात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. भर उन्हात चाचणीदोन दिवसात ट्रॉलीद्वारे भर उन्हात रुळांचे परिक्षण करण्यात आले. त्यामुळे अधिकारी, कर्मचा:यांचे भर उन्हात मोठे हाल झाले. संपुर्ण 35 किलोमिटर रुळाचे परिक्षण करण्यात आल्यानंतर सोमवारी दुपारी दोन ते चार वाजेच्या दरम्यान या मार्गावरून प्रत्यक्षात चाचणी रेल्वे चालविणत आली. त्यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या.
रनाळे ते दोंडाईचा दरम्यान ताशी 120 कि.मी.ने धावली रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 1:08 PM