नंदुरबार : विजांच्या कडकडाटासह नंदुरबारात सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता पावसाला सुरुवात झाली. साधारणत: एक तास तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी हवेचा वेग वाढल्यानंतर साडेसात वाजण्याच्या सुमारास तुरळक पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट सुरू झाला.
विजाही चमकत होत्या. नंदुरबार शहरासह तालुक्यातील अनेक भागांत साधारणता तासभर पाऊस सुरू होता. गेल्याच आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्यांचे पंचनामे पूर्ण होत नाहीत, तोच पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हाताचा जाणार आहे. याशिवाय टरबूज, डांगर, कांदा, पपई या पिकांना मोठा फटका बसणार आहे.