शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

‘ऑफशोअर ट्रफ’मुळे उत्तर महाराष्ट्रात पावसाचा खोळंबा

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: July 09, 2018 5:04 PM

संतोष सूर्यवंशी । नंदुरबार : अरबी समुद्राबाहेर निर्माण झालेल्या ऑफशोअर ट्रफ (वा:यांचा द्रोणीय भाग) वा:यांमुळे उत्तर महाराष्ट्रात पावसाचा खोळंबा झाला आह़े विशेषत नंदुरबार जिल्ह्यात पुढील आठवडय़ातसुध्दा मध्यम पावसाचीच शक्यता कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ डॉ़ शुभांगी भुते यांनी वर्तविली आह़ेपश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भ, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातसुध्दा बहुतेक ...

संतोष सूर्यवंशी । नंदुरबार : अरबी समुद्राबाहेर निर्माण झालेल्या ऑफशोअर ट्रफ (वा:यांचा द्रोणीय भाग) वा:यांमुळे उत्तर महाराष्ट्रात पावसाचा खोळंबा झाला आह़े विशेषत नंदुरबार जिल्ह्यात पुढील आठवडय़ातसुध्दा मध्यम पावसाचीच शक्यता कुलाबा वेधशाळेच्या शास्त्रज्ञ डॉ़ शुभांगी भुते यांनी वर्तविली आह़ेपश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने विदर्भ, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातसुध्दा बहुतेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आह़े सागरी किनारा असलेल्या परिसरात ब:यापैकी पजर्न्यमान झालेले दिसून येत आह़े त्या तुलनेत मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात मात्र पावसाने पाठ फिरवल्याने अनेकांचा हिरमोड  झाला आह़े उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यांचा विचार करता जळगावात समाधानकारक पावसाने हजेरी लावली आह़े परंतु तो पाऊसही दमदार म्हणता येणार नाही़ उर्वरीत जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची नोंद झालेली आह़े अरबी समुद्राबाहेर वा:यांचा ‘ओफशोअर ट्रफ’ म्हणजेच द्रोणीय भागाची निर्मिती झालेली आह़े त्यामुळे उत्तर महाराष्ट्राला पावसाची अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे कुलाबा वेधशाळेकडून सांगण्यात आले आह़े मुंबई, कोकण व विदर्भाला बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयापासून पाऊस मिळत असून पुढील 48 ते 72 तासात याची तीव्रता अधिक वाढणार असल्याचे मत वेधशाळेकडून सांगण्यात आले आह़े मध्यमस्वरुपाचा पाऊसवेधशाळेकडून सांगण्यात आल्यानुसार पुढील आठवडय़ातसुध्दा मध्यमस्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आह़े गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या मान्सूनची वाटचार मोठय़ा प्रमाणावर संथ गतीने होत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आह़े अद्याप मान्सूनचा बराचसा कालावधी बाकी आह़े परंतु सुरुवातीलाच अध्र्या महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे साहजिकच सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आह़े समुद्र किना:या आतील द्रोणीय भाग ठरु शकतो फायदेशिरसध्या अरबी समुद्राच्या किना:या बाहेरच ‘ऑफशोअर ट्रफ’ म्हणजे वा:यांचा द्रोणीय भाग निर्माण झाला आह़े हीच परिस्थिती समुद्र किना:या आत निर्माण झाली असती तर, यातून उत्तर महाराष्ट्राला पजर्न्यमानाबाबत ब:यापैकी फायदा झाला असता, असे मत शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आह़ेपावसाळ्यातील कोरडे दिवस वाढत असल्याने सर्वत्र पावसाबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आह़े बहुतेक शेतक:यांनी पावसाच्या प्रतीक्षेत खरिप हंगामातील पेरण्यासुध्दा केल्या नसल्याची स्थिती आह़े शनिवारी रात्री अर्धा तास पावसाने हजेरी लावली होती़ परंतु अशा प्रकारे तुरळक पावसामुळे हवेतील आद्रतेत अधिक वाढ होत आह़े जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही़ त्यामुळे साहजिकच सर्वाचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत़