शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

प्रकाशाजवळ बिबट्याच्या हल्ल्यात दुर्मिळ साळींदरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:38 PM

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुर्मिळ प्रजातीचे साळींदर ठार झाल्याची घटना सोमवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दुर्मिळ प्रजातीचे साळींदर ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली़ दरम्यान हा प्रकार सुरू असताना प्रत्यक्षदर्शीने ही घटना बघितल्याने बिबट्यानेच साळींदर ठार केल्याच्या घटनेला दुजोरा मिळत आहे़सोमवारी सकाळी प्रकाशा ते नांदरखेडा रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या ग्रामस्थांना साळींदर मृतावस्थेत आढळून आला़ काटेरी केस लांबवर विखुरल्याचे तसेच शरीरावर जखमा असलेले साळींदर मृतावस्थेत पडून असल्याचे दिसून येत होते़ यावेळी शेतातून परत येणाऱ्या एका युवकाने याठिकाणी बिबट्या पाहिल्यानंतर या मार्गाने जाणाऱ्यांना तो सतर्क करुन तिकडे जावू नका असे सूचित करत होता़ या युवकाने साळींदरवर बिबट्याने हल्ला केला असल्याची माहिती दिली़ दरम्यान साळींदरच्या मानेवरसह शरीराच्या इतर भागावर हिंस्त्र प्राण्याच्या पंजाच्या खूणा असल्याचे दिसून आले़ यामुळे साळींदरला बिबट्याने ठार मारले असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे़दरम्यान प्रकाशा परिसरात आजवर साळींदर आढळून आलेले नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ आहे़ या प्राण्याचे अस्तित्त्व जंगलासह शेतशिवारात असते़ तीन फूट उंची असलेल्या या प्राण्याचा मृत्यू झाल्यानंतर दुपारपर्यंत त्याच्या शरीराचे कुत्र्यांनी लचके तोडून नेले होते़ दुपारी प्रकाशा ते नांदरखेडा रस्त्यावर केवळ साळींदरचे काटे पडले होते़ वनविभागाच्या कर्मचाºयांनी या घटनेकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी आहे़साळींदरच्या मान आणि पोटाच्या भागावर हल्ला झाल्याने हिंस्त्र प्राण्याने तो केला असावा असा अंदाज आहे़ गावाकडे येणाºया युवकाने रात्री बिबट्याला ऊसाच्या शेतात पळताना पाहिल्याने बिबट्या आणि साळींदर यांच्यात खूपवेळ संघर्ष सुरू असावा असा अंदाज आहे़ साळींदरचे काटे जागोजागी पडून होते़ दरम्यान या भागात बिबट्याचा संचार असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट झाल्याने वनविभागाने तातडीने उपाययोजना करून माहिती घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे़