शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

कोविड कक्षासाठी २०० आॅक्सिजन सिलींडर मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 1:54 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने कोविड कक्षातील सोयी सुविधा अपूर्ण पडत आहेत़ यातून कक्षासाठी लागणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने कोविड कक्षातील सोयी सुविधा अपूर्ण पडत आहेत़ यातून कक्षासाठी लागणाऱ्या आॅक्सिजन सिलींडरबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते़ यातून कक्षांसाठी १०० सिलींडर हवेत ही स्थिती मांडली गेली़ वृत्ताची दखल घेत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने २०७ सिलींडर खरेदी केले आहेत़कोरोना संसर्ग झाल्यानंतर श्वास घेण्यास तकलीफ होणाºया रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयातील नेत्रकक्ष आणि नर्सिंग कॉलेज या दोन ठिकाणी व्हेंटीलेटरची सोय करण्यात आली आहे़ या व्हेंटीलेटरसाठी आॅक्सिजन सिलींडर वेळोवेळी लागत आहेत़ जिल्हा रुग्णालयात धुळे येथून सिलींडरचा पुरवठा दररोज पुरवठा करण्यात येतो़ मात्र दरदिवशी वाढत असलेले रुग्ण आणि मयतांची संख्या पाहता आॅक्सिजन सिलींडर वाढीव हवेत अशी शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली होती़ ‘लोकमत’ने हे वृत्त प्रकाशित केल्याच्या केवळ चार दिवसात जिल्हा रुग्णालयाने वाढीव सिलींडर खरेदी करुन धुळे येथील ठेकेदाराला ते भरुन पाठवण्याचे सूचित केले आहे़ वाढीव सिलींडर मिळाल्याने श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांची सोय होणार आहे़ मागवण्यात आलेले सर्व सिलींडर तातडीने भरुन देण्यासाठी धुळे येथे पाठवण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे़कोविड कक्षातील किमान ३५ बेडसाठी वेळोवेळी दोनपेक्षा अधिक सिलींडर्सचा वापर करण्यात येत असल्याने दिवसभरात किमान ५० च्या जवळपास सिलींडरचा वापर होत असल्याची माहिती आहे़ यात धुळे येथून ६० पेक्षा अधिक सिंलीडर येत नसल्याने उपचार सुरू असताना तुटवड्याची शक्यता निर्माण होत होती़ एखादा गंभीर रुग्ण उपचार घेत असताना सिलींडर संपल्यास गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने रुग्णालयाने सिलींडर खरेदी करुन घेतली असल्याची माहिती देण्यात आली आहे़जिल्हा रुग्णालयाने ठाणे येथून हे सिलींडर खरेदी केली असल्याची माहिती आहे़ यात २०७ सिलींडर हे एक हजार लीटरपेक्षा अधिक क्षमता असलेले जंबो सिलींडर आहेत़ उर्वरित १३० सिलींडर हे मोठ्या क्षमतेचे आहेत़ खाली सिलींडर उपलब्ध झाल्यानंतर तातडीने ते आॅक्सिजन भरण्यासाठी धुळे येथे पाठवण्यात आले आहेत़ तेथून दरदिवशी सिलींडर जिल्हा रुग्णालयात पुरवण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान जिल्हा रुग्णालयातील इतर अपुºया सुविधांसाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे़जिल्हा रुग्णालयात ६६०, एक हजार ३२० लीटर क्षमता आणि जम्बो अशा तीन प्रकारचे सिलींडर पुरवले जातात़ सोबत १ हजार ८५१ लीटर क्षमतेचे नायट्रोक्स आॅक्साईड, कार्बन डायआॅक्साईड आदी सिलींडरचा पुरवठा करण्यात येतो़ कृत्रिम श्वास प्रणालीसाठी या सिलींडरचा वापर करण्यात येतो़ रुग्णालयाच्या नेत्र कक्षात २५ तर नर्सिंग कॉलेजमध्ये १० अशा ३५ बेडला हे सिंलीडर लावून रुग्णांच्या शरीरातील आॅक्सिजन लेव्हलवर नियंत्रण ठेवण्यात येते़ यासाठी हे सिलींडर्स उपयोगी होते़ त्यांची खरेदी झाल्याने प्रश्न मिटला आहे़