लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील कोळपांढरी गावाला सत्यमेव वॉटर कप स्पर्धा पाणी फाऊंडेशन 2019 या वर्षाचा तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पुरस्कार मिळाला. ही स्पर्धा यशस्वीतेसाठी ज्यांनी सहकार्य केले. त्या सर्व श्रमदात्यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य मृदसंधारण विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय पावरा बारेला समाज मंडळाचे अध्यक्ष नामदेव पटले तर प्रमुख अतिथी म्हणून सातपुडा पावरा समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सुरेश मोरे, कृषीभूषण हिरालाल ओंकार पाटील, शिरपूर तालुका कृषी अधिकारी अनिल निकुम, शहादा तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, पाणी फाउंडेशनचे गुणवंत पाटील, वडगावचे सरपंच रमेश जाधव, शहाणाचे सरपंच रवींद्र पाडवी, लंगडीचे सरपंच तोताराम पावरा, कृषी पर्यवेक्षक मनोहर सैंदाणे, पत्रकार दिनेश पवार, कृषी पर्यवेक्षक मनोज खैरनार, कृषी सहाय्यक सुनील सुळे, ग्रामसेवक गणेश सुळे, ग्रा.पं. सदस्य गोविंद पटले, कृषीसेवक हिरालाल पटले, राजू मोते, नीलेश सुळे उपस्थित होते. या वेळी कैलास मोते म्हणाले की, आपल्याला तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा पाणी फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाल्याबद्दल एक सकारात्मक संदेश सर्वत्र जाईल. गावातील सर्वपक्षीय घटकांनी एकत्र येऊन सर्व हेवेदावे बाजूला करून गाव पाणीदार करण्यासाठी एकत्र आले. एकीच्या बळाने काम केले तर काय होऊ शकते हे कोळपांढरी या गावाने दाखवून दिले. यातून तालुक्यातील गावांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र बादले यांनी तर आभार रमेश पटले यांनी मानले.
प्रथम पुरस्कार मिळाल्याने श्रमदात्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:27 PM