लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संचारबंदीच्या काळात कॉलनीत विनाकारण फिरणा:या व तोंडाला मास्क न लावणा:या सहा जणांना नंदुरबार न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, तोंडाला मास्क लावावा याबाबत सांगूनही नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. 14 एप्रिल रोजी सकाळी व सायंकाळी विविध भागात पोलिसांनी कारवाई केली होती. अशा सहा जणांना शुक्रवारी नंदुरबार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.ए.विराणी यांच्या कोर्टापुढे त्यांना उपस्थित करण्यात आले. न्यायलायाने शिक्षा सुनावतांना आदेशाचे पालन न केल्याने व मार्गदर्शक सुचनांचे पालन न केल्याने दोषी ठरवून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पाच दिवस साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये सुलतानशहा बाबू शहा, रा.बागवान गल्ली, चंद्रकांत मोरे रा.रामदेवबाबा नगर, बन्सीलाल बागले, रा.चव्हाण चौक, फत्तेसिंग चंदू गावीत, रा.सोनाबाई नगर, जयेश रवींद्र देवरे, रा.रेल्वे कॉलनी, नारायण रामा मिस्तरी, रा.डुबकेश्वर मंदीराजवळ, नंदुरबार यांचा समावेश आहे. न्यायालयात दोषारोपपत्र उपनिरिक्षक माळी व महाले यांनी सादर केले.
कॉलनीत विना मास्क फिरणा:यांना दोन हजार रुपये दंडाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 12:33 PM