संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागात केंद्रशासनाच्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’च्या लाभासाठी गरोदर मातांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े दुर्गम भागात बँक शाखांचे जाळे नसल्याने, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले बँक खाते उघडण्यासाठी अडचणी निर्माण होत आह़ेगरीब, आदिवासी, गरोदर मातांना आर्थिक मदत व्हावी तसेच माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्रशासनाकडून ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ राबविण्यात येत आह़े परंतु जिल्ह्यातील दुर्गम भागात पुरेशा बँकशाखा अद्यापही पोहचल्या नसल्याने केंद्राच्या या महत्वाकांक्षी योजनेपासून अनेकांना वंचित रहावे लागणार असल्याची स्थिती दिसून येत आह़े धडगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची केवळ एकच शाखा आह़े त्यामुळे सातपुडय़ाच्या जवळ असलेल्या या दुर्गम भागातील गर्भवती महिलांना योजनेचा लाभ घेण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात या योजनेचे महत्व अनन्य साधारण आह़े दुर्गम भागात बहुतेक महिला घरीच प्रसुत होतात़ त्यामुळे माता मृत्यू व नवजात शिशु दगावण्याच्या संख्येतही मोठी वाढ होत असत़े खाजगी दवाखान्यात ‘सिजेरियन’ तसेच प्रसुतीचा खर्च न परवडणारा असतो़ त्यामुळे मोलमजुरी करुन आपले पोट भरणा:या या आदिवासी महिलांना घरीच प्रसुती करण्याशिवाय पर्याय नसतो़ दुर्गम भागातील गरोदर महिलांना प्रसुतीचा खर्च, आवश्यक खाद्य पुरविण्यासाठी आर्थिक मदत म्हणून केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु करण्यात आली आह़े परंतु अशा अडचणींमुळे ही योजना अद्यापही दुर्गम भागातील लाभाथ्र्यापासून कोसो दुर असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आह़े जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून योजना राबविण्यासाठी उत्तम काम बजाविण्यात येत आहे, यात शंका नाही़ परंतु बँकाचे जाळे अधिक विस्तारणे आवश्यक आह़े
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात ‘मातृवंदना’ची वाट बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 1:01 PM
संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागात केंद्रशासनाच्या ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’च्या लाभासाठी गरोदर मातांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आह़े दुर्गम भागात बँक शाखांचे जाळे नसल्याने, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले बँक खाते उघडण्यासाठी अडचणी निर्माण होत आह़ेगरीब, आदिवासी, गरोदर मातांना आर्थिक मदत व्हावी तसेच माता ...
ठळक मुद्देकाय आहे योजना.. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत लाभार्थी गरोदर मातांना तीन टप्प्यात 5 हजार रुपयांच्या निधीचे वाटप करण्यात येत असत़े पहिल्या टप्प्यात गरोदरपणाची लवकरात लवकर (150 दिवसाच्या आता) नोंदणी केल्यावर 1 हजार रुपये, सहा महिन्यानंतर परंतु किमान ग