लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आचारसंहिता सुरू होताच सर्वच लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकाऱ्यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. दरम्यान, जिल्ह्यात केवळ आमदार सुरुपसिंग नाईक व आमदार चंद्रकांत रघुवंशी या दोन लोकप्रतिनिधींकडेच शस्त्र परवाणे असून निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्यांनी ते जमा केले आहेत.जिल्ह्यातील चार आमदार व एक खासदार यांना पोलीस संरक्षण पुरविण्यात आलेले आहे. आमदार उदेसिंग पाडवी यांनी मागणी केली नसल्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण पुरविले गेले नाही. परंतु आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच या सर्व लोकप्रतिनिधींचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर दुसऱ्या कुठल्याही राजकीय पदाधिकाºयाला पोलीस संरक्षण देण्यात आलेले नव्हते.शस्त्र परवाणा देखील केवळ दोनच लोकप्रतिधिंकडे असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली. आमदार सुरुपसिंग नाईक व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे पूर्वीपासून शस्त्र परवाणा आहे. निवडणुकीची घोषणा होताच त्यांनी देखील आपली शस्त्रे स्थानिक पोलीस ठाण्यात जमा केली असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.
लोकप्रतिनिधींचे पोलीस संरक्षण घेतले काढून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:36 AM