लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रब्बी हंगामातील पिकांसाठी ठाणेपाडा ता.नंदुरबार येथील लघुतलावातून शेतक:यांना सिंचनासाठी आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध व्हावे, पाणी पुरवठय़ासाठी कुठल्याही अडचणी येऊ नये, यासाठी लोकसहभागातून कालव्यांची दुरुस्ती करण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा व शनिमांडळ या क्षेत्रातील शेतक:यांना रब्बी हंगामात पिके घेण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. ठाणेपाडा येथील लघुतलाव यंदा दमदार पावसामुळे चांगला भरला आहे. त्यामुळे हा तलाव यंदाच्या रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी आधारभूत ठरत आहे. या तलावाचे दोन्ही कालवे व पाटचारी दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पाटबंधारे विभाग, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाटबंधारे विभागाचे कॅनॉल निरीक्षक कोळी, डीएससी संस्थेचे कार्यकारी संचालक मोहन शर्मा, प्रकल्प संचालक जितेंद्र सोनवणे, राकेश अहिरराव सुधिर मावची, चंद्रकांत देवरे, शामकांत पाटील, जयदीप पनवार, प्रकाश सोनवणे, सुकन्या देवरे, भाग्यश्री राठोड आदी उपस्थित होते. यावेळी ठाणेपाडा धरणाच्या दोन्ही कालव्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या धरणातून शेतक:यांना समान पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले. यासाठी पाणी वापर संस्था देखील स्थापन करण्याचा निर्णय घेत त्याद्वारे सिंचन व्यवस्थापन करीत सर्व शेतक:यांना आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रय} केला जाणार आहे. बैठकीत लोकसहभागातून कालव्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेत प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामालाही सुरुवात करण्यात आली. त्यात ठाणेपाठा व शनिमांडळ परसरातील शेतक:यांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवला. त्यांच्याकडून धरणाच्या कालव्यांमध्ये वाढलेली झाडे, झुडपे काढण्यात आली. त्याशिवाय पाटचारींची देखील दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे ठाणेपाडा व शनिमांडळ भागातील बहुसंख्य शेतक:यांना या धरणातील पाणी उपलब्ध होणार आहे.
ठाणेपाडा धरणातील पाणी व्यवस्थापनासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत पाणी वापर संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कुठल्याही शेतक:यावर अन्याय न होता समान पद्धतीने पाण्याचे वाटप करता येणार आहे. शेतक:यांच्या हितासाठी विविध निर्णय घेणे व नियोजनासाठी सात सदस्सांची एक समिती देखील स्थापन करण्यात येणार आहेत. या समितीमार्फत पाणी वाटपाच्या नियोजनासह सिंचन, व्यवस्थापन, नियम-अटी तयार करण्यात येणार आहे. या अटीनुसारच पाणी वाटप करण्यात येणार आहे.शेतक:यांच्या सिंचन सुविधांसाठी काम करतांना शेतक:यांना भरघोस उत्पादन घेता यावे, यासाठी विविध उपक्रम देखील घेण्यात येणार आहे. त्यात शेतीच्या नवीन व सुधारित पद्धती, सिंचनाचे तंत्रज्ञान, पिक पद्धती यावर देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शेतक:यांच्या सर्वागिण विकासासाठी शेतीशाळा, पिक प्रात्यक्षिके, माती परिक्षण हे उपक्रम देखील राबविण्यात येणार आहे. त्याशिवाय शेतकरी गट स्थापन करीत त्यांना गांडुळ खत निर्मिती, बिज प्रक्रिया हे उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामुळे शेतक:यांच्या विकासात भर पडणार असल्याचे म्हटले जात आहे.