शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

विद्यार्थ्याने बनवली बसस्थानकाची प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:24 PM

सुनील कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्क आष्टे : कोरोना महामारीमुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक शालेय विद्यार्थ्यांनी सुटीचा ...

सुनील कुलकर्णी ।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टे : कोरोना महामारीमुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक शालेय विद्यार्थ्यांनी सुटीचा आनंद लुटला. मात्र नंदुरबार येथील के.आर. पब्लिक स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमात सहावीच्या वर्गा शिकणाऱ्या प्रथम प्रशांत गुजराथी या विद्यार्थ्याने घरीच नंदुरबार येथील बसस्थानकाची हुबेहूब प्रतिकृती साकारली. प्रथमच्या या कलाकृतीचे कौतुक होत आहे.नंदुरबार शहरातील गांधीनगर भागात राहणाºया प्रथम गुजराथी या विद्यार्थ्यास शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त काहीतरी नवीन करण्याचा छंद आहे. कोरोना लॉकडाऊन काळात घरीच असल्यामुळे विविध उपक्रम राबविण्याचा मानस प्रथमने आई-वडिलांजवळ व्यक्त केला. वडील प्रशांत गुजराथी राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारात वाहतूक नियंत्रक असल्यामुळे प्रथमने नंदुरबार बसस्थानकाची प्रतिकृती बनविण्याचा संकल्प केला. यासाठी वस्तूंची जुळवाजुळव करण्यात आली. टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ साहित्य बनविण्यासाठी तब्बल एक ते दीड महिन्याचा कालावधी लागला. प्रथम गुजराती याने सुंदर आणि रेखीव पद्धतीने राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराची प्रतिकृती तयार केली. यात नंदुरबार बसस्थानकावरील फलांटांप्रमाणे चौकशी कक्ष, प्रवासी बैठक व्यवस्था, फलक, पंखे, खांब, विविध टाकाऊ वस्तूपासून बनविले. याशिवाय फलाटावर परिवर्तन, विठाई, शिवशाही, शिवनेरी, अश्वमेघ या विविध प्रकारच्या एसटी बसेसच्या प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस नंदुरबार बसस्थानकावरील विद्युत रोषणाईकरिता तंतोतंत शोभून दिसणारे एलईडी लाईट्स बसस्थानकाच्या सौंदर्यात भर घालतात. याचबरोबर सध्या लॉकडाऊनमुळे बसस्थानकावर प्रवासी नसल्याने बाकेदेखील रिकामी दिसून येतात. प्रथम यास वडील प्रशांत गुजराथी, आई तृप्ती गुजराथी, आजी कपिला सुरेश गुजराथी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. भविष्यात वैज्ञानिक किंवा अभियंता होण्याची इच्छा प्रथम गुजराथी याने व्यक्त केली.