लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : महाकाय सरदार सरोवर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने अक्कलकुवा तालुक्यातील बामणी, सिंदुरी, धनखेडी आणि मणिबेली या चार गावात पाणी शिरले होत़े याठिकाणी बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आह़े अक्कलकुवा तहसील कार्यालयाने याठिकाणी तीन कर्मचा:यांची नियुक्ती केली आह़े 16 ऑगस्टपासून सरदार सरोवराच्या बुडीत क्षेत्रात येणा:या चारही गावांमध्ये पाणी शिरल्याने स्थानिक ग्रामस्थांचे हाल सुरु झाले होत़े शेतीसह घरांमधील अन्नधान्य संपूर्णपणे पाण्यात जाऊन नुकसान झाल्यानंतरही नर्मदा विकास विभागाने याठिकाणी मदत पोहोचवली नव्हती़ यातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती़ सरदार सरोवराची पातळी ही 138़28 मीटर झाल्यानंतर या गावांमध्ये पाणी पातळी वाढली होती़ यात बामणी येथील दिवाल्या जुगला वसावे यांच्यासह तिघा बाधितांची घरे पूर्णपणे पाण्यात गेली होती़ त्यांच्यासाठी नर्मदा विकास विभागाने बांधलेल्या शेडचेही पत्रे उडून गेल्याने समस्या निर्माण झाली होती़ दरम्यान सोमवारी अक्कलकुवा तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना परिसरातील गावातील नागरिकांनी पूराची भीषणता नजेरस आणून दिल्यानंतर बचावकार्यास सुरुवात करण्यात आली आह़े याठिकाणी तहसीलदार यांनी पुरवठा विभागाचे अधिकारी, मंडळाधिकारी आणि तलाठी यांची नियुक्ती केली आह़े सोमवारी पाण्याची पातळी वाढल्याने अधिकच हाल होत असल्याचे सांगण्यात आले आह़े या स्थितीवर मात करुन बाधितांना मदत देणा:या नर्मदा विकास विभागाचे अधिकारी मात्र कुठेही दिसून येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े बुधवारी तहसीलदार यांच्यासह नर्मदा विकासचे उपअभियंता हे या गावांना भेट देणार आह़े दरम्यान प्रकल्पबाधित घोषित केल्याशिवाय घरे सोडणार नसल्याचे पूरग्रस्तांकडून सांगण्यात आल्याची माहिती आह़े
नर्मदा काठावरील चार गावांमध्ये प्रशासनाकडून बचावकार्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:09 PM