लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊन काळात ग्राहकांना तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल देण्यात आले आहे़ या बिलांबाबत ग्राहकांनी तक्रारी सुरु केल्याने तक्रार निवारण शिबिरे घेण्यात येत आहेत़ शहरात वीज कंपनीच्या कार्यालयात ग्राहक चर्चासत्र शिबिर घेण्यात आले़ यात ५३४ ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे़कंपनीचे अधिक्षक अभियंता आऱएम़चव्हाण यांच्या मार्गदर्शनात कार्यकारी अभियंता मनीषा कोठारी, कार्यकारी अभियंता धीरज दुपारे यांनी शिबिरात उपस्थिती देत ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या़ या एकूण ५५० ग्राहकांच्या तक्रारी कंपनीला प्राप्त झाल्या होत्या़ त्यापैकी ५३४ ग्राहकांच्या तक्रारी निकाली काढण्यात प्रशासनाला यश आले आहे़ या ग्राहकांना आलेले वाढीव वीज बिल व इतर बाबी समजावून देण्यात आल्या़ शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील ग्राहकांनी तक्रारी देण्यासाठी यावेळी गर्दी केली होती़ अधिकाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते़
५३४ कर्मचाऱ्यांच्या वीजबिल तक्रारी निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 11:50 AM