कार्यक्रमास वाहन चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादाभाई मिस्तरी, जिल्हा सचिव सुनील बोरसे, नंदुरबार तालुका अध्यक्ष विजय गिरासे, हरीश गवळी, नंदुरबार शहराध्यक्ष दिलीप मेणे, शहादा तालुका अध्यक्ष बापू राजपूत, कोषाध्यक्ष सुभाष गिरासे, प्रकाशा येथील भरत रामदास चौधरी, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष किशोर चौधरी आदी उपस्थित होते. प्रारंभी अंबेमातेच्या प्रतितेचे पूजन करण्यात आले. या वेळी प्रकाशा गावासह वैजाली, बोराळा, कोरीट, पिसावर येथील रिक्षा, टेम्पोचालक, ट्रॅक्टर, खासगी वाहन व ट्रक चालकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी दादाभाई मिस्तरी म्हणाले की, कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालत सर्व वाहन चालकांनी गरजू रुग्णांना दवाखान्यात व दवाखान्यातून घरापर्यंत पोहोचविले. या काळात वाहन चालकही समाज कार्यात अग्रेसर होते. वाहन चालवताना मद्यपान करू नका, वाहन डाव्या बाजूने चालवा, सिग्नल बघा, आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल असे वागू नका, सर्वांशी नम्रतेने वागा व वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. हरीश गवळी, बापू राजपूत, सुनील बोरसे, किशोर चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास छोटू सामुद्रे, दिलीप चौधरी, उमर जहागीरदार, राजू माळी, शेख अहमद, विलास मराठे, आकाश राजपूत, संतोष चव्हाण, वसंत चौधरी, मुन्ना पाटील, संतोष चव्हाण, सुरेश गुरव, जितेंद्र कोळी, प्रकाश कोळी, आण्णा पवार, जगदीश गुरव, सीताराम पवार, बबलू गुरव, प्रकाश गुरव, किल भिल, सचिन जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी भुताळी गल्लीतील तरुणांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन नरेंद्र गुरव तर आभार भरत चौधरी यांनी मानले.