नंदुरबार : एकतर्फी करण्यात आलेल्या पगारवाढी विरोधात राज्यभरातील एसटी कर्मचा:यांकडून संप पुकारण्यात आला आह़े त्याला नंदुरबार जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय़ नंदुरबार व नवापूर आगारातून सकाळच्या सत्रातील बसफे:या वगळता अक्कलकुवा, शहादा, धडगाव आगारात कडकडीत संप पाळण्यात आला़ या वेळी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली़ राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात आलेली पगारवाढ ही एकतर्फी आह़े त्यात, कर्मचा:यांना विश्वासात न घेता निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत राज्यभरात एसटी महामंडळाच्या कर्मचा:यांनी संप पुकारला आह़े संपाला नंदुरबारातही प्रतिसाद मिळताना दिसून येत आह़े नंदुरबार आगारातून औरंगाबाद, पंढरपूर बसफेरी वगळता इतर सर्व बसफे:या रद्द करण्यात आल्या आहेत़ त्याच प्रमाणे शहादा आगारातून सकाळी एकही बस सोडण्यात आली नाही़ तेथे सकाळपासूनच तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने वाढीव पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता़ नवापूर आगारातून सकाळच्या सत्रातील बसफे:या सुरळीत झाल्यात़ तर, अक्कलकुवा आगारातर्फेही सकाळच्या सर्व बसफे:या रद्द करण्यात आल्या आहेत़
एसटी कर्मचा-यांच्या संपाला नंदुरबारात प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:32 PM