लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला़ शुक्रवारी मंडळाच्या संकेतस्थळावर हे निकाल जाहिर झाले असून नंदुरबार जिल्ह्याचा निकाल 29़71 टक्के लागला आह़े 17 ते 30 जुलै दरम्यान झालेल्या या परीक्षेसाठी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर पुर्नपरीक्षार्थीची परीक्षा घेण्यात आली होती़ परीक्षेसाठी नंदुरबार जिल्ह्यातून 3 हजार 67 विद्याथ्र्याची नोंदणी झाली होती़ त्यापैकी 2 हजार 888 विद्यार्थी परीक्षेला बसले होत़े यातील केवळ 858 विद्यार्थीच उत्तीर्ण झाले असून त्याची टक्केवारी ही 29 टक्के एवढी आह़े निकाल जाहिर करण्यात आल्यानंतर शाळांमध्ये तो उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती कळवण्यात आली आह़े ज्या विद्याथ्र्याना गुणपडताळणीसाठी अर्ज करावयाचा असेल त्यांनी ऑनलाईन निकाल जाहिर झाल्यानंतर शुल्कासह 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर्पयत मंडळांकडे अर्ज करावयाचा असल्याचे सांगण्यात आले आह़े 31 आगस्टपासूनच विद्यार्थी छायाप्रतींसाठी मंडळांकडे अर्ज करु शकणार असल्याची माहितीही देण्यात आली आह़े
दहावीच्या पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:50 PM