नंदुरबार : प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या प्रथम सत्राच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. काही शाळांनी सुरुवातीलाच तोंडी परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे तर काही शाळा लेखी परीक्षेनंतर तोंडी परीक्षा घेणार आहेत. असे असले तर मजूर स्थलांतर करीत असतांना आपल्या पाल्यांना देखील घेवून जात असल्यामुळे अनेक शाळा ओस पडत आहे. परिणामी सत्र परिक्षांवर देखील परिणाम होत आहे. दरम्यान, पायाभूत चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आता विद्या प्राधिकरणाकडून न येता स्थानिक ठिकाणीच शिक्षक काढणार आहेत. त्यामुळे प्रश्नपत्रिकांचा घोळ थांबणार आहे.दुष्काळाच्या पाश्र्वभुमीवर यंदा प्रथम सत्राच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. सोमवारपासून काही शाळांमध्ये तोंडी परीक्षेला सुरुवात झाली आहे. लेखी परीक्षांना येत्या दोन दिवसात सुरूवात होणार आहे. 3 नोव्हेंबर्पयत प्रथम सत्राच्या लेखी व तोंडी परीक्षा झाल्यानंतर दिवाळीच्या सुटय़ा राहणार आहेत. साधारणत: 17 ते 21 दिवस या सुटय़ा राहणार आहेत. 20 नोव्हेंबरपासून दुस:या सत्राला सुरुवात होणार आहे. दुष्काळी पाश्र्वभुमीजिल्ह्यात दुष्काळी पाश्र्वभुमीवर यंदा शाळांच्या परीक्षा होत आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. खरीप पीक हाताचे गेल्याने ग्रामिण भागात हलाखीची परिस्थिती निर्माण होत आहे. अशा वेळी या परीक्षा होत आहेत.मजुरांचे स्थलांतरजिल्ह्यातील अनेक गावांमधील मजुर रोजगारासाठी इतर जिल्ह्यात स्थलांतर करीत आहेत. गावोगावी ट्रका भरून मजूर परराज्या रवाना होत आहेत. मजुर आपल्यासोबत आपल्या पाल्यांना देखील घेवून जात असल्यामुळे त्यांच्या शाळेचा आणि परीक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे ग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. मुलांना परीक्षेनंतर घेवून जाण्याची विनंती काही ठिकाणी शिक्षक करीत आहेत. पायाभूत चाचणीसाठी सर्वच विद्यार्थी उपस्थित राहणे आवश्यक असते. त्यामुळे शिक्षकांची घालमेल सुरू आहे. दुसरीकडे स्थलांतरीत होणारे मजूर व पालक आपल्या पाल्याला अर्थात विद्याथ्र्याला कुणाच्या भरोशावर गावी सोडून जावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकत आहे. यामुळे विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यावर प्राथमिक शिक्षण विभागातर्फे पर्याय निर्माण करणे आवश्यक आहे.
नंदुरबारातील मजूर स्थलांतरामुळे परीक्षांवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 4:08 PM