शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

पाऊस परतल्याने नंदुरबारातील पिकांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 1:14 PM

नंदुरबार : नंदुरबारात श्रावणाच्या सुरुवातीपासून आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील साधारणत दीड लाख हेक्टरवरील पिकांना दिलासा मिळाला आह़े त्यामुळे साहजिकच शेतक:यांमध्ये समाधान दिसून येत आह़े पावसानंतर काही प्रमाणात उनदेखील पडत असल्याने हे वातावरण पिकांच्या वाढीसाठी पोषक असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़ेनंदुरबारात साधारणत जुन व जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडलेला होता़ पावसाने ...

नंदुरबार : नंदुरबारात श्रावणाच्या सुरुवातीपासून आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील साधारणत दीड लाख हेक्टरवरील पिकांना दिलासा मिळाला आह़े त्यामुळे साहजिकच शेतक:यांमध्ये समाधान दिसून येत आह़े पावसानंतर काही प्रमाणात उनदेखील पडत असल्याने हे वातावरण पिकांच्या वाढीसाठी पोषक असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़ेनंदुरबारात साधारणत जुन व जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडलेला होता़ पावसाने दडी मारली असल्याने एकूण खरिप हंगामातील 2 लाख 41 हजार 761 हेक्टरापैकी साधारणत दीड लाख हेक्टरावरील पिकं धोक्यात आलेली होती़ त्यात कापूस पिकाची स्थिती अधिकच चिंताजनक होती़ जिल्ह्यात  एकूण 1 लाख 6 हजार क्षेत्रापैकी खरिप हंगामात 1 लाख 4 हजार 649 हेक्टरावर कापसाची पेरणी करण्यात आलेली आह़े जिल्ह्यात आतार्पयत साधारणत 92 टक्के खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत़जिल्ह्यात सरासरी पावसाच्या निम्मे पाऊस झालेला असला तरी सध्या येत असलेल्या पावसामुळे पिके तरारली आहेत़ श्रावण महिन्यात झालेल्या पावसामुळे कापसावर सकारात्मक परिणाम झालेला दिसून येत आह़े तीन दिवसांपासून पावसाची हजेरीगेल्या आठवडय़ापासून पावसाने सलग हजेरी लावलेली आह़े नंदुरबार शहरासह, तळोदा अक्कलकुवा, नवापूर आदी तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली दिसून येत आह़े ग्रामीण भागात पावसाची संततधार दिसून येत आह़े नंदुरबारात सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावलेली होती़ दुपार्पयत दमदार पाऊस झाल्यानंतर काहीसे उन्ह पडलेले दिसून आल़े  तळोद्यातील ग्रामीण भागात दिवसभर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु होता़ त्यामुळे शेतक:यांना काही काळ शेती कामे थांबवावी लागली होती़केळी, पपई पिकांना दिलासाशहादा, तळोदा तालुक्यासह  नंदुरबार तालुक्यातील परिसरात केळी व पपई पिक घेण्यात येत असत़े जुन व जुलै महिन्यात पाउसपाणी नसल्याने ही पिकही धोक्यात आलेली होती़ हमखास उत्पन्न मिळवून देणारे पिक म्हणून केळी तसेच पपईकडे पाहिले जात असत़े परंतु पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारली असल्याने शेतकरी संकटात सापडलेले होत़े ऑगस्ट महिन्यात पाऊस  परतल्याने ही पिक आता धोक्याबाहेर असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े 1 लाख हेक्टरवर कापूस लागवडजिल्ह्यातील एकूण 1 लाख 6 हजार क्षेत्रापैकी खरिप हंगामात 1 लाख 4 हजार 649 हेक्टरावर कापसाची लागवड करण्यात आलेली आह़े  तालुकानिहाय पाहिले असता, नंदुरबार 39 हजार 480 हेक्टर, नवापूर 5 हजार 121 हेक्टर, शहादा 47 हजार 488, तळोदा 8 हजार 420 हेक्टर, अक्राणी 480 हेक्टर, अक्कलकुवा 3 हजार 660 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आह़े यंदाच्या पावसाळ्यात तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, रोझवा पूनर्वसन आदी परिसरात पिकपाणी बरे असले तरी, नंदुरबार तालुका, शहाद्यातील काही भाग वगळता इतर बहुतांश ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आह़े अशीच परिस्थिती अक्कलकुवा, धडगाव आदी परिसराचीसुध्दा          आह़े शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गणित हे खरिप हंगामावरच अवलंबून असत़े गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरडय़ा दिवसांची संख्या वाढली असल्याने साहजिकच याचा परिणाम उत्पन्नावर जाणवनार आह़े जलस्त्रोतांमध्ये वाढ होणे गरजेचेयंदाच्या उन्हाळ्यामध्ये जिल्ह्याचा पारा 44 अंश सेल्शिअसर्पयत गेला होता़ वर्षागणिक उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत आह़े त्यामुळे साहजिकच जिल्ह्याच्या पाणी पातळीत मोठी घट झालेली आह़े त्याताच पावसाळ्यात जुन व जुलै महिना संपूर्ण कोरडा गेल्याने पाण्याची समस्या निर्माण झालेली आह़े जिल्ह्यात आतार्पयत सरासरी 54 टक्के इतका पाऊस झालेला आह़े त्यामुळे यातून लघु व मध्यप्रकल्पांमध्ये काही अंशीच वाढ झालेली दिसून येत आह़े सप्टेंबरच्या शेवटापासून परतीच्या पावसाला सुरुवात होत असत़े त्याला अजून साधारणत 1 महिन्याचा अवकाश आह़े त्यामुळे या दरम्यान, दमदार पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े परतीच्या पावसाचा कालखंड वाढत असल्याने त्या दरम्यानही चांगला पाऊस होणे अपेक्षीत आह़े