रायखेडजवळ चोरटय़ांनी मोटारसायकल सोडून चाके लांबवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:48 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून चो:यांचे प्रमाण वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्री येथून मोटारसायकल लंपास करून दोन्ही चाके, डिस्क, बॅटरी व पेट्रोलची चोरी करून रायखेडजवळील नदीत फेकून दिल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. ब्राrाणपुरी येथील राजाराम उखा पाटील यांची मोटारसायकल (क्रमांक एम.एच.39 ...
लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून चो:यांचे प्रमाण वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्री येथून मोटारसायकल लंपास करून दोन्ही चाके, डिस्क, बॅटरी व पेट्रोलची चोरी करून रायखेडजवळील नदीत फेकून दिल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.ब्राrाणपुरी येथील राजाराम उखा पाटील यांची मोटारसायकल (क्रमांक एम.एच.39 के-1970) शुक्रवारी रात्री अंगणात उभी होती. चोरटय़ांनी ही मोटारसायकल रात्रीतून लंपास केली. चोरटय़ांनी रायखेड शिवारातील सुकनाई नदीत मोटारसायकल नेवून दोन्ही चाके, डिस्क, बॅटरी व पेट्रोल काढून घेतले व मोटारसायकल तेथेच सोडून पलायन केले. शनिवारी सकाळी राजाराम पाटील यांना अंगणात मोटारसायकल न दिसल्यान त्यांनी शोधाशोध सुरू केली. ब्राrाणपुरी येथील शेतकरी आपल्या रायखेड शिवारातील शेतात गेले असता त्यांना दोन्ही चाके काढलेली मोटारसायकल नदीत दिसली. त्यांनी याबाबत ब्राrाणपुरी येथे संपर्क करून ही माहिती दिली. त्यानंतर राजाराम पाटील हे तेथे गेले असता त्यांना मोटारसायकलीची दोन्ही चाके, बॅटरी, डिस्क व पेट्रोल काढल्याचे दिसले. या मोटारसायकलीतून 15 हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी चोरून नेवून मोटारसायकल तेथेच फेकून दिली.ब्राrाणपुरी परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून चो:यांचे प्रमाण वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून चोरटय़ांचा तपास लागत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवून चोरटय़ांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.